*फिटे अंधाराचे जाळे.. झाले मोकळे आकाश.. बार्डी च्या रानावनातून वाहे एक प्रकाश.....!!* *प्रशांत परिचारकांचे भाषण... अचानक वीज गेली... मग कार्यकर्ते ....ग्रामस्थांनी मोबाईल बॅटरीवर दिला प्रकाश.......!!*

करकंब /प्रतिनिधी :-
आज दररोज बदलत्या राजकारणामुळे गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत राजकीय कुस्त्यांचे कलगीतुरा जनसामान्यांना बघण्यात रस उरला नसला तरी नेते ज्याप्रमाणे दिवसाला चार पक्ष बदलतात... त्याच नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीने कार्यकर्ता ही दिवसात आठ पक्षांमध्ये पक्षांतर करतो. ही बाब काय लपून राहिलेली नाही. असे असले तरी आजही राजकारणामध्ये "निष्ठा" आणि "तत्व "याला किती महत्त्व असते. याची प्रचिती बार्डी तालुका पंढरपूर येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकीतील नूतन सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी आला.
बार्डी येथील नुकत्याच संपन्न झालेल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी सरपंच व पांडुरंग चे माजी संचालक दिनकर कवडे आणि सरपंच अभिजीत कवडे यांच्या पांडुरंग ग्रामविकास पॅनल ने दहा पैकी दहा जिंकून एक हाती सत्ता मिळाल्याने हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार समारंभ च्या निमित्ताने सन 1982 साली प्रदर्शित झालेल्या "लक्ष्मीची पावले" या मराठी चित्रपटातील गीतकार- सुधीर मोघे आणि गायक -सुधीर फडके व आशा भोसले यांच्या फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश.. दरी- खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश..... ! रान जागे झाले सारे पायवाटा ,,जाग्या झाल्या साऱ्या...!! या गाण्याची आठवण करून देणारी जिल्ह्याचे अभ्यासू नेते व माजी आमदार-
प्रशांत परिचारक यांच्या या भाषणाच्या वेळी बार्डीकर यांना याही देही याही डोळा आठवण झाली.
या सत्कार समारंभाच्या वेळी व्यासपीठावर माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार -बबनदादा शिंदे , व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू माजी आमदार-प्रशांतराव परिचारक यांनी आलेल्या नवनिर्वाचित सर्वांना शुभेच्छा व्यक्त करीत असतानाचं अचानकपणे ... "विज"... गेली. त्यातच बार्डी ..हे गाव पूर्वीपासूनच पायवाटा.. रानवाटा ...दुष्काळग्रस्त गाव ...पण उपस्थित असलेल्या समोरच्या जनसमुदायांनी.... ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी काय पण... "विज" गेली म्हणून काय लगेच मोबाईल चा "टॉर्च" चालू केला. अशातच जिल्ह्याचे अभ्यासू माजी आमदार- प्रशांतराव परिचारक यांनी नवनिर्वाचित निवडून आलेल्या सदस्यांना लोकांसाठी पुढील विकासाच्या कामाबाबत काम करण्याची यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आपले नेते यांचे शब्द ऐकण्यासाठी बार्डी ग्रामस्थांनी वरील गाण्याप्रमाणे आजच्या राजकारणामध्ये एक आगळा- वेगळा संदेश या निमित्ताने बार्डीकर ग्रामस्थांनी दिला असल्याची चर्चा सध्या या बार्डीसह परिसरातून व्यक्त केली जात आहे.