*करकंब येथील कृषी चालकाने तालुका कृषी अधिकारी यांनी सील केलेले दुकान फोडले...!* *तालुका कृषी अधिकारी सरडे.. यांची करकंब कडे धाव....!!!* *शेतकऱ्यांमधून तीव्र संताप*.

करकंब /प्रतिनिधी :-
करकंब येथील शुक्रवार पेठ येथे गेल्या काही महिन्यापूर्वी ओंकार कृषी केंद्रातून करकंब येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तणनाशक औषध खरेदी करून तणनाशकासाठी वापरण्यात आली होती. यामध्ये 20 ते 25 शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान होऊन या द्राक्ष बागा पूर्णता उध्वस्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने करकंब पोलीस ठाण्यात सदर ओंकार कृषी केंद्र आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी या ओंकार कृषी केंद्राच्या दुकानाला तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी भेटी देऊन हे दुकान सील करण्यात आले होते.
इतके दिवस उलटूनही संबंधित ओंकार कृषी केंद्राचे मालक चालक -संजय पवार यांनी तालुका कृषी अधिकारी-सरडे यांनी सील केलेले तोडून या दुकानातील आवश्यक असलेली औषधे येथील करकंब येथील एका इसमाच्या मदतीने परस्पर विक्री केली असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी ओंकार कृषी केंद्र समोर गर्दी केली .
यावेळी या ओंकार कृषी केंद्राच्या दुकानचे सील तोडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी-सरडे यांना कळविण्यात आल्यानंतर तालुका कृषी अधिकारी -सरडे.. यांनी करकंब येथे तातडीने धाव ....घेतली. आणि या कृषी केंद्रा च्या दुकानात जाऊन सर्व मालाची तपासणी करत असताना या कृषी दुकानातच एक मोठे गोडाऊन सापडल्याने तालुका कृषी अधिकारी-सरडे . हे ही प्रचंड आवाक.... झाले. सध्या या कृषी दुकानाची तपासणी सुरू असून अद्याप पर्यंत करकंब पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
या ठिकाणी ही बाब समजल्यानंतर करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक -अजित मोरे. , पोलीस हे. कॉन्स्टेबल -कैलास हरिहर. , पो. कॉ.- आर .आर .जाधव .यांनीही तातडीने भेट दिली.