*नांदोरे येथील हॉकी स्टिक मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधारास आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी*

*नांदोरे येथील हॉकी स्टिक मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधारास आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी*

करकंब /प्रतिनिधी

:-नांदोरे ता. पंढरपूर येथील हॉकी स्टिक ने मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी असलेल्या पांडुरंग उर्फ पांड्या भिंगारे. राहणार - नांदोरे यास करकंब पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत या मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पांडुरंग उर्फ पांड्या भिंगारे यास करकंब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,  अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली या नांदोरे मारहाण प्रकरणात मधील करकंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी असलेला आरोपी पांडुरंग उर्फ पांड्या भिंगारे याचा शोध मोहीम घेणे बाबत आदेश देण्यात आलेले होते. हॉकी स्टिक मारहाण प्रकरणातील   गुन्ह्याचा कट रचून गुन्ह्याचे वेळी स्वतःला करकंब येथील जगताप हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल झाल्याचे भासवून गुन्हा उघडकीस आल्यापासून फरार झाला होता. या गुन्ह्यामध्ये यापूर्वी  सहा आरोपींना अटक केलेली असून त्यांनीही आरोपी पांडुरंग उर्फ पांड्या भिंगारे यानेच फिर्यादी असलेल्यास मारहाण करण्याचा कट रचल्याचे सांगितले होते. 
सदर आरोपी पांडुरंग उर्फ पांड्या भिंगारे हा बाहेरच्या राज्यामध्ये जाण्याच्या प्रयत्नात असताना करकंब पोलीस ठाण्याचे धडाकेबाज पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार मोरे व पोलीस पथकाने त्याचा माग काढून त्याला अटक केलेली असून त्यास पंढरपूर न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी वाळू चोरी, जबर मारहाण, टोळी युद्ध यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार मोरे, पोलीस ना. अभिजीत कांबळे, पोलीस ना. संतोष पाटेकर, पोलीस ना. मयूर गव्हाणे, पोलीस ना. भोसले यांनी केलेली आहे.