*मुख्यमंत्री यांची सोशल मीडियातून बदनामी करणाऱ्या महाराजाला करकंब पोलिसांनी घेतले ताब्यात
*मुख्यमंत्री यांची सोशल मीडियातून बदनामी करणाऱ्या महाराजाला करकंब पोलिसांनी घेतले ताब्या
करकंब/प्रतिनिधी
करकंब ता पंढरपूर येथील एका व्हाट्सअप्प ग्रुपवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारी पोस्ट केल्याने येथील रामनारायणदास गोपालदास बैरागी महाराज यांच्यावर करकंब पोलिसात दि 24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सविस्तर माहिती अशी की,करकंब मधील शूरवीर महाराणा प्रताप या व्हाट्सअप्प ग्रुप वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामी व सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट येथील रामनारायणदास गोपालदास बैरागी महाराज यांनी केली होती याप्रकरणी बैरागी हे दि 24 पासून पोलिसांना मिळून येत नव्हते.या घटनेसदर्भात पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी करकंब पोलीस स्टेशनला भेट देऊन व योग्य त्या सूचना केली होती.त्यांनतर आज दि 25 रोजी करकंब पोलिसांनी मोठ्या शिताफीने रामनारायणदास गोपालदास बैरागी महाराज यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर मधून ताब्यात घेतले.करकंब पोलिसांनी सदर आरोपीला 12 तासाच्या आत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस करीत आहेत.
चौकट :-
सोशल मीडियातून कोणतेही संदेश पाठविताना कोणतेही सामाजिक तेढ निर्माण होणार नाहीत तसेच सामाजिक भावना दुखावणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी व सोशल मीडियाचा वापर सर्वांनी काळजीपूर्वक करावा.