*करकंब पोलिसांनी केले  संमिश्र वस्ती मध्ये कायदा-सुव्यवस्था च्या अनुषंगाने रूट मार्च ......!*

*करकंब पोलिसांनी केले  संमिश्र वस्ती मध्ये कायदा-सुव्यवस्था च्या अनुषंगाने रूट मार्च ......!*

करकंब /प्रतिनिधी

:-सध्या राज्यामध्ये घडत असलेल्या विविध घटनांच्या बाबत ग्रामीण भागात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. व कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने करकंब पोलीस ठाण्याच्या वतीने करकंब शहरातून तसेच करकंब येथील संमिश्र वस्ती व भोसे, पट कुरोली, उंबरे मेंढापूर आदीसह करकंब सह सत्तावीस गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था च्या अनुषंगाने करकंब पोलिसांनी रुट मार्च काढण्यात आला.
यावेळी करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे व करकंब पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.
करकंब पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या करकंब आणि सत्तावीस गावांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. शांतता राहावी या अनुषंगाने करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश तारु पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी संमिश्र वस्ती भागांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले.