*करकंब चा कागदावरच विकास.... गाव मात्र भकास.....!* *हाच आमचा करकंब चा विकास.*

*करकंब चा कागदावरच विकास.... गाव मात्र भकास.....!*  *हाच आमचा करकंब चा विकास.*

.

करकंब /प्रतिनिधी

:- करकंब हे पंढरपूर व माढा तालुक्याची राजकीय राजधानी त्याचबरोबर ऐतिहासिक ,प्राचीन ,धार्मिक स्थळ म्हणून आजही प्रसिद्ध आहे. यापूर्वी करकंब हे हात मागासाठी महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध होते. द्राक्षे निर्यातीसाठी करकंब गावचा परदेशातही डंका वाजत होता. त्याच बरोबर राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या करकंब गावचा कागदावरच विकास...... गाव मात्र सगळीकडे झाले भकास.....! अशी चर्चा सुज्ञ नागरिकातून केली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी 17 सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत असून करकंब हे मुख्य तालुक्याचे ठिकाण असल्याने या करकंब गावाशी आसपास असलेल्या करकंब सह42 गावातील लोकांचा सातत्याने संपर्क होत असतो. एक खासदार,दोन आमदार , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,सरपंच ,जिल्हा संघटनेचे पक्षाचे जिल्ह्याचे दोन डझनाहून अधिक पदाधिकारी इतका भरणा करकंब गावामध्ये असताना करकंब च्या विकासासाठी आलेला विकासाचा निधी नेमका जातो कुठे...? यात याचे कोडे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. हे कोडे सोडविण्यासाठी ना सत्ताधारी विचार करीत आहेत ना विरोधक याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. विकासासाठी निधी आणला जातो .अगदी खेचून आणला जातो.. पण गावात मात्र सगळा जिकडे -तिकडे ....भकास दिसतो. दिसले तर विकास.. नावाची लोक रोजच भेटतात... आणि हाच आमचा करकंब चा विकास... अशी चर्चाही लोक करतात. 
दलित वस्ती निधी, 15 वा वित्त आयोग, २५/१५ चा निधी आमदार निधी, खासदार निधी, ग्रामनिधी व इतर निधी हे सर्व आलेले निधी पाट्या लावण्या पुरतेच दिसून येत असल्याची चर्चा असून आलेला निधी कागदावर खर्च करण्यापेक्षा प्रत्यक्षात या या शासनाच्या मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीची काटेकोरपणे अंमलबजावणी करून निधीचा गावासाठी व गावच्या विकासासाठी उपयोग व्हावा .अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची प्रचंड लूट या निधीच्या माध्यमातून होत असल्याची चर्चाही ग्रामस्थांतून सातत्याने होत असते. अशा मिळालेल्या निधीतून तसेच भ्रष्टाचारा संबंधी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तेरी भी चूप व मेरी भी चुप ही भूमिका असल्याची चर्चा काही सदस्यांमधून व ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात सुरू आहे. विकास कामाबरोबरच सामान्य जनतेच्या मूलभूत कामाकडे ही सत्ताधारी व विरोधकांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिला नसल्याची खंत काही सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवली.