*तर कदाचित विठ्ठलची निवडणूकच लागली नसती*  * ऍड गणेश पाटील यांचा विरोधकांवर प्रहार*

*तर कदाचित विठ्ठलची निवडणूकच लागली नसती*   * ऍड गणेश पाटील यांचा विरोधकांवर प्रहार*

पंढरपूर (प्रतिनिधी)

विठ्ठलच्या निवडणुकीत विरोधक तुम्हीही संचालक मंडळात होता , कारखाना बुडत असताना तुम्ही काय केलं ? असे प्रश्न विचारून सभासदांची दिशाभूल करत आहेत. युवराज दादांनी कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीचा आदेश दिला. या जप्तीच्या आदेशावर स्थगिती आणण्याचे काम आम्ही मंडळींनीच केले. हे केले नसते तर कदाचित ही निवडणूकच लागली नसती. कारखाना कोणाच्यातरी घशात गेला असता , अशी प्रतिक्रिया गणेश पाटील यांनी व्यक्त केली .बुधवारी युवराज पाटील गटाच्या प्रचारार्थ बादलकोट येथे घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.


विठ्ठल कारखान्यावर आर्थिक अराजकता ओढवली आहे. ही अराजकता दुसऱ्या कोणी आणली नसून, सत्ताधाऱ्यांचाच प्रताप आहे.
विठ्ठल कारखान्यास आर्थिक खाईत लोटले जात असताना, युवराज पाटील आणि कै. राजूबापू पाटील यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली होती . परंतु इतर संचालक मंडळ सत्ताधाऱ्यांच्या ऐकण्यात असल्यामुळे, दोघांचीही भूमिका डावलण्यात आली असल्याचे मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले. 

संचालक मंडळात असल्याने युवराज पाटील यांच्यावर विरोधक प्रहार करत आहेत. कारखान्याकडे असणाऱ्या थकीत कर्जामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्यास जप्तीची नोटीस बजावली होती. या जप्तीच्या आदेशावर स्थगिती मिळवण्याचे काम युवराज दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केले आहे.
ही स्थगिती आणली नसती तर आजपर्यंत कारखान्याची अवस्था वेगळीच दिसली असती. बँकेने हा कारखाना कोणातरी ठेकेदारास चालवण्यासाठी दिला असता, आणि मग ही निवडणूक बघण्याचे दिवस सभासदांना आलेच नसते, असे परखड मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले.


 यावेळी युवराज पाटील यांनी सभासदांना पाठीशी राहण्याचे आवाहन केले. इतर स्थानिक शेतकरी सभासदांनीही आपली मनोगते व्यक्त केली, आणि युवराज दादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा 
निर्धार केला.


चौकट

विठ्ठल कारखान्याची मागेच वाताहत झाली असती. संचालक मंडळात असणाऱ्या युवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कारखाना खऱ्या अर्थाने वाचवला आहे. यामुळेच विठ्ठल कारखान्याची निवडणूक पाहण्याचे भाग्य सभासदांना मिळाले आहे.
असे परखड मत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी बादलकोट येथील बैठकीत केले आहे.