*भीमाची परिस्थिती सुधारण्यासाठी परिवर्तन हाच इलाज* *कर्जमुक्त असलेला भीमा कारखाना कर्जबाजारी केला* *भीमा बचाव परिर्वन पॅनलच्या बैठकीत बाळराजे पाटील यांचा  मोलाचा   सल्ला!*

*भीमाची परिस्थिती सुधारण्यासाठी परिवर्तन हाच इलाज* *कर्जमुक्त असलेला भीमा कारखाना कर्जबाजारी केला*  *भीमा बचाव परिर्वन पॅनलच्या बैठकीत बाळराजे पाटील यांचा  मोलाचा   सल्ला!*

। मोहोळ, प्रतिनिधी,

 भिमा सहकारी साखर कारखान्यावर पूर्वी आमच्या गटाची सत्ता असताना व्यवस्थित व्यवहार सुरू होते. परंतु विद्यमान चेअरमनची सत्ता या कारखान्यावर आल्यास यापेक्षाही आपल भले होईल. या आशेवर सभासद यांनी सत्तांतर घडविले. परंतु सभासदांचा फार मोठा भ्रमनिरास झाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. यातून कर्जमुक्त असणारी ही संस्था कर्जबाजारी केली. यातून आता सर्वांना सावरण्यासाठी एकच इलाज असून, तो म्हणजे या निवडणुकीत सत्ता परिवर्तन करणे आहे. असा मोलाचा सल्ला बाळराजे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
   भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर पंचवार्षिक निवडणुक विचार विनिमय करणेसाठी भीमा कार्यक्षेत्रातील मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे भीमा बचाव परिवर्तन पॅनल वतीने  दि.3 रोजी सभासद व शेतकरी यांची महत्त्वाची बैठक अध्यक्षस्थानी भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन कल्याणराव पाटील, तर लोकनेते शुगरचे चेअरमन मा.बाळराजे पाटील,पंढरपूर कृषी बाजार समिती सभापती दिलीप घाडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
प्रसंगी बोलताना लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील या बैठकीनिमित्त आपण सर्व सभासदांनी निर्धार करायचा आहे या भिमा बचाव परिवर्तन पॅनलला मतदान करून प्रचंड बहुमताने  विजयी करण्याचे आहे आज ही निवडणूक सभासद तसेच कारखाना कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यावर कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक माजी आमदार राजनजी पाटील यांनी काटकसरीने चालवून कारखान्यावर एक रुपयाही कर्ज नव्हते आज गेल्या दहा वर्षापासून 600 कोटी कर्ज भीमा कारखान्यावर आहे. उद्या या माळावर भीमा कारखाना होता म्हणण्याची वेळ न येऊ देण्यासाठी भीमा बचाव परिवर्तन पॅनलला विजयी करा आणि माजी आमदार राजनजी पाटील तसेच माजी आमदार प्रशांतजी परिचारक यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळा  चित्रावर शिक्का मारून बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
प्रसंगी भीमा कारखान्याचे  माजी व्हाईक चेअरमन कल्याणराव पाटील भीमा कारखाना हा तुमच्या वडिलांनी उभा केला हे खरे परंतु माझ्या शेतकरी बांधवांनी आमच्या भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र ठेवून तुम्हाला सभासद रक्कम दिल्या आणि हा कारखाना उभा राहिला हे विसरू नका. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची देणी वेळेत न दिल्याने त्यांच्या मुलाबाळांची शिक्षण तसेच लग्न लांबणीवर पडले आहेत याचा कुठेतरी विचार केला गेला नाही. माननीय खासदार साहेबांनी कारखान्याचे भंगार विकले आणि त्यांचे चिरंजीव विश्‍वराज महाडिक यांनीही विकले वर्षातून दोन वेळा कारखान्याचे भंगार विकणार्‍यांना या निवडणुकीमध्ये सभासद धडा शिकवणार म्हणाले.
यावेळी माजी संचालक शिवाजीराव चव्हाण, युवा नेते महेश पवार, कृषी बाजार समिती सभापती असलम चौधरी,उद्योजक दत्तात्रय काकडे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश दळवे, रमेश फाटे, समाजसेवक रामभाऊ शेळके, हरिभाऊ चवरे, उद्योजक जालिंदर लांडे,माजी संचालक बाळासाहेब भोसले, माजी शिक्षण समिती अध्यक्ष महावीर भोसले, दीपक माळी, सरपंच संदीप पवार  पदाधिकारी,सभासद,शेतकरी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.