अधुनिक दृष्टीने शेती करावी ः देसाई

प्रतिनिधी : पंढरपूर
शेतकर्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी अधुनिक पध्दतीने बिज प्रक्रीया, लागवड, पाणी व्यवस्थापन यांचा वापर केला पाहीजे. कारण अधुनिक पध्दतीने शेती केली असता पिकाच्या उत्पादन वाढीची हमी तर मिळतेच परंतु शेतीसाठी लागणार्या पाणी व पैशाची मोठी बचत होते. त्यामुळे शेतकर्यांनी उपलब्ध हवामान व साधन सामुग्रीनुसार अधुनिक दृष्टीकोनातून शेती केली पाहीजे असे प्रतीपादन कृषी पर्यवेक्ष बी.जे.देसाई यांनी केले.
पंढरपूर तालुका कृषी अधिकारी आर.वाय.पवार व मंडल कृषी अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडलेल्या कृषी संजिवनी मोहीमेअंर्तगातील कार्यक्रमा प्रसंगी कृषी पर्यवेक्षक देसाई बोलत होते. त्यांनी पुढे बोलताना अधुनिक शेतीबाबत माहिती सांगितली. यावेळी या कार्यक्रमासाठी सरपंच शशिकला चव्हाण, उपसरपंच हनुमंत कदम, ग्रा.प.सदस्य अनिल कदम, विलास भोसले, नितीन कदम, सिध्देश्वर भोसले, विष्णू खरे, मारूती पाटोळे , भाऊ बंडगर, आशोक शेडगे, अनिल जाधव जनहित शेतकरी संघटनेचे औदुंबर गायकवाड यांच्यासह ग्रमपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाप्रसंगी कृषी सहाय्यक आर.डी.पवार, टि.एन.लवटे, एच.डी.माळी यांनी बिज प्रक्रीया, माती परीक्षण, ऊस लागवड, पाणी व्यवस्थापन यासह फळबाग लागवड योजना, शेती आवजारे योजना याची माहिती उपस्थित शेतकरी यांना दिली. तर यावेळी शेतकर्यांनी आपल्या समस्या विचारून उपस्थित अधिकार्यांकडून समस्यांचे निर्सन करून घेतले.