*"नादब्रह्म कला" फाऊंडेशनच्या वतीने करकंब येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिराचे आयोजन*

*"नादब्रह्म कला" फाऊंडेशनच्या वतीने करकंब येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिराचे आयोजन
करकंब /प्रतिनिधी
:-"नादब्रह्म कला" फाऊंडेशनच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट ते २२ऑगस्ट सकाळी ६:००ते८:३०या वेळेमध्ये श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून ६ दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले असून,या शिबिरात शरीराच्या आरोग्याविषयी विविध समस्यांवर आपल्याला यामध्ये मात करता येणार असून संपूर्ण जगामध्ये १४४ देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग च काम चालू आहे,यामध्ये योगा,प्राणायाम,आणि सुदर्शन क्रिया ध्यान,संत्सग,सेवा,अशा अनेक गोष्टींचा लाभ मिळणार आहे,आपल्या आयुष्याला सुंदर बनवण्याची कला म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर होय,या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी गेली २० वर्षाचा अनुभव असणारे लातूर येथील टीचर घनशाम कारंडे येणार आहेत,तरी ज्या प्रमाणे आपण आपल्या निर्जीव असलेल्या दुचाकी, चारचाकी गाडीची न विसरता सर्व्हिसींग करतो त्या प्रमाणे आपण आपल्या शरीर रुपी देहाची सर्व्हिसिंग केलीच पाहिजे.निश्चित या शिबिराचा आपल्याला लाभ होईल याची खात्री देतो,तरी सर्वांनी नावनोंदणी करुन घेण्यासाठी घनश्याम कारंडे९४०३१९९३५१ आणि ज्ञानेश्वर दुधाणे ९७६७७७६८५८यावर संपर्क करण्याचे अवाहन नादब्रह्म कला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण युट्यूबवर पाहु शकता.