*अंधत्व असलेले सख्खे भाऊ जगतात संघर्षातून आपले जीवन... शोधतात रोज नवीन जगण्याचा आधार....!*  *दृष्टिहीन बंधूंची संघर्षांची जोडी*

*अंधत्व असलेले सख्खे भाऊ जगतात संघर्षातून आपले जीवन... शोधतात रोज नवीन जगण्याचा आधार....!*   *दृष्टिहीन बंधूंची संघर्षांची जोडी*

 
करकंब /प्रतिनिधी:

जर मानवाला दृष्टी असेल तर या सृष्टीमधील ईश्वराने निर्माण केलेले अद्भुत वैभव, व  जगण्याचा वेगळा अनुभव दृष्टी द्वारे समजेल. पण या जगात व आपल्या अवतीभवती दृष्टी विना कित्येक जण आहेत .दिसतात दृष्टी विना जे अंधत्व आहेत , त्यांचे आयुष्य अंधारमय असल्याने त्यांना जगण्याची कुठलीही अपेक्षा नसताना त्यांच्यासाठी जीवन एक प्रचंड संघर्ष आणि कसोटी आहे. असे असतानाही करकंब येथील सखे दोन बंधू भीम किसन शिंदे,(माळी), व अर्जुन किसन शिंदे (माळी) हे दोघेजण दोन्ही डोळ्याने अंध असतानाआजच्या कठीण परिस्थितीमध्ये संघर्षाचे जीवन जगून जगण्याचा नवीन आधार शोधत आहेत.
   करकंब येथील हे दोन्ही अंध बंधू भीम-अर्जुन अगदी महाभारतातली जोडी दोघांनीही उच्च शिक्षण घेतलेले आहे तेही ब्रे लिपीतून मात्र आज त्यांना बेकारीचे जीवन जगावे लागते. जागा जमीन घर निवारा नीट नाही. अगदी गावाच्या कडेला जिथे चांगल्या माणसाला नीट जाता येत नाही .त्यातून या दोन अंध भावांना रोजची पायपीट करून कधी उपाशी पोटी तर कधी मिळेल ते खाऊन आपले जीवन जगावे लागते. उच्च शिक्षण घेऊनही बेकारी, या अंध बंधूंना राहण्यासाठी निवारा नाही .आई वडिलांचा आधार गेला. अशात या दोन अंध बंधूंना कुठल्याही प्रकारे ना शासकीय मदत मिळाली ना शासकीय मदतीचा आधार दिला. अनेक वर्षापासून हे दोन अंध बंधू भीम आणि अर्जुन शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहिले आहेत. अशा लोकांसाठी निवारा व किमान उपाशीपोटी राहू नये काळजी घेणे खरी गरज आहे.