*कंदील घेऊन दर्शनाला जाण्याची भक्तांवर वेळ* *नवरात्र काळात पथदिवे बंद, भक्तांमधून तीव्र संताप*

करकंब/प्रतिनिधी,
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे.गेल्या दीड वर्षांपूर्वी सुरू झालेला कोरोनाचा कहर सध्या तरी कमी होत असल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वत्र ठप्प असलेले व्यवहार, शाळा, मंदीरे सुरू झाली आहेत. सर्वत्र दर्शनासाठी गर्दी होत आहे. अशातच नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. करकंब मध्ये मोडनिंब रोडवरील असलेली माळावरची देवी तुळजाभवानी च्या,नेमतवाडी चौकातील ग्रामदैवत कनकंबा मातेच्या दर्शनासाठी सायंकाळी 5 नंतर व पहाटे अनेक भाविक विशेषतः महिला भक्त दर्शनासाठी पायी जात असतात.करकंब मधील रोडलाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. सध्या सर्वत्र पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी,खड्डे पडले आहेत,गारव्यामुळे साप फिरण्याचे दिवस सुरू आहेत.परंतु ग्रामपंचायत कडे थकबाकी असल्याच्या कारणाने महावितरण ने वीज बंद केली आहे. यामुळे देवीला येणाऱ्या तसेच गावातही खरेदी साठी व अन्य कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तरी या गोष्टीचा विचार करून त्वरित पथदिवे सुरू करावेत अशी मागणी भाविक व ग्रामस्तातून होत आहे.
चौकट # [करकंब ग्रामपंचायत स्थापना 1935 ला झाली 1939 ला रॉकेल वरील दिवे गावात चौकात सुरू झाले.काही वर्षानंतर विजेचे दिवे सुरू झाले तेव्हापासून गाव उजेडात आले मात्र ग्रामपंचायत व विजवीतरण यांच्या कृपेने गावत प्रकाशा ऐवजी या वर्षी गाव अंधारात आले आहे.या मुळे नागरिकांतून तीव्र संताप पहायला मिळत आहे.]