*शासन निर्णयानुसार अपंगांना गाळे वाटप करावे.* *करकंब येथील अपंगाचा पाच टक्के निधी देण्याची मागणी*

करकंब/ प्रतिनिधी
येथील प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष महेंद्र साधू लोंढे व त्यांच्या सर्व अंध अपंग आधी इतर सहकाऱ्यांनी करकंब ग्रामपंचायत कडे सन 2012 ते सन 20 21 या कालावधीमधील अपंगाचा निधी अद्याप पर्यंत वाटप केला नाही. करकंब येथे ऑनलाइन अपंग व इतर असे 60 ते 70 लाभार्थी असून या लाभार्थ्यांना या निधीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी लेखी अर्जाद्वारे सरपंच/ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तसेच शासन निर्णयानुसार करकंब ग्रामपंचायती ने अपंगासाठी गाळ्याची तरतूद करण्याची मागणी प्रहार अपंग संघटना करकंब यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष महेंद्र लोंढे, शरद शिंदे बाळू पेठकर दत्ता धायगुडे समाधान माळी हनुमंत जाधव शिवराज उंबरजे आदी उपस्थित होते.