*सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी युवा भीमसेनेचे मुंबईत आंदोलन* * संस्थापक विलास माने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आमरण उपोषण सुरू*

पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यातील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी युवा भिम सेना आणि भारतीय मानवतावादी पार्टीकडून आंदोलन छेडण्यात येत आहे. सोमवार दि ११ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती, युवा भिमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास माने यांच्याकडून देण्यात आली आहे . या आंदोलनास राज्यातून अनेक संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्यातील सफाई कमगार असंघटित असल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. अनेक वर्षापासून सफाई कामगारांची भरतीच करण्यात आलेली नाही. हजारो सफाई कामगार सेवानिवृत्त झाले ,काम होत नसल्याने हजारोंनी सेवानिवृत्ती घेतली, तरीही सफाई कामगारांची भरती होत नसल्याने, कामावर असणाऱ्या एका सफाई कमगारास चार कामगारांचे काम करावे लागत आहे .सफाई कामगारांच्या नोकर भरतीची मागणी होऊ लागल्याने तसेच त्यांच्या इतर प्रश्नांवर अभ्यास करण्यासाठी, सरकारने लाड -पागे समितीची स्थापना केली होती . या समितीने अहवालही सादर केला आहे. सफाई कामगारांच्या वारसांना प्राधान्याने सेवेत घेण्याची शिफारस या समितीने केली आहे. २०१६ साली या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला आहे. यानंतर चार वर्षे उलटली तरीही, सफाई कामगारांची नोकर भरती करण्यात आलेली नाही . सफाई कामगारांच्या शिक्षणानुसार त्यांना कर्मचाऱ्यांच्या तृतीय श्रेणीत समावेश करण्याची सूचनाही या समितीने केली होती. या सूचनेची कार्यवाही आजतागायत झालेली नाही . यासारख्या सफाई कामगारांच्या अनेक प्रश्नासंदर्भात, युवा भिमसेना आणि भारतीय मानवतावादी पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे .
आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवल्या आहेत. सफाई कामगारांची तत्काळ नोकरी कोणती करावी , स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या वारसांना सेवेत घ्यावे, तसेच लाड - पागे समितीच्या शिफारशींप्रमाणे सफाई कामगारांना सवलती देण्याची आग्रही मागणी , या संघटनांकडून करण्यात आली आहे. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवार दि.ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येत असल्याची माहिती , युवा भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास माने आणि राष्ट्रीय महासचिव दयानंद जगन्नाथ सोहनी यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
चौकट
सफाई कामगारांची नोकरभरती तात्काळ करावी , या कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे , याचवेळी राज्यातील सफाई कामगारांना लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सवलती देण्यात याव्यात , या मागण्यांसाठी युवा भिम सेनेकडून मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येत असल्याची माहिती, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास माने यांच्याकडून देण्यात आली आहे.