*चेअरमन अभिजीत पाटील यांची वचनपूर्ती* *विठ्ठलच्या थकित ऊस बिलाचे वाटप झाले सुरू* *सहकार शिरोमणीलाही 2500भाव मिळुन देण्यासाठी निवडणूक लढवू*
पंढरपूर /प्रतिनिधी
विठ्ठल कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकलेली ऊसबिले देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, चेअरमन अभिजीत पाटील यांचे हे मोठे यश समजले जात आहे. बाजारपेठेत कारखान्याची पत राहिली नसताना अवघ्या दोन महिन्यात, अभिजीत पाटील यांनी याबाबत तोडगा काढला आहे. विठ्ठल कारखान्यावर पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना त्यांच्यासोबत जुन्या जाणत्या सवंगड्यांचाही सहभाग होता.
आर्थिक अरिष्टात सापडलेला विठ्ठल कारखाना, चेअरमन अभिजीत पाटील यांच्यामुळे स्थिर होऊ लागला आहे. विठ्ठल कारखान्याच्या निकालाने अभिजीत पाटील यांना चेअरमन केले अवघ्या दोन महिन्यात त्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले देण्यासाठी अथक परिश्रम केले. ऊस बिले दिल्याशिवाय कारखान्यात मोळी टाकणार नाही हा शब्द खरा करून दाखवला.
सन २०१९-२० साली झालेल्या गळीत हंगामात सुमारे तीन लाख टन उसाचे गाळप झाले होते. या bj कारखान्याकडे थकीत होती या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांची आंदोलनेही झाली होती. सत्तापालट होईपर्यंत तत्कालीन संचालक मंडळास ही बिले देण्यात अपयश आले होते. त्यास कारखान्याची उडालेली पत कारणीभूत होती. अभिजीत पाटील यांच्या रूपाने कारखान्यास नवसंजीवनी मिळाली आहे. मंगळवार दि. ७ सप्टेंबरपासून थकीत उस बिले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील दहा पीपल्स मल्टीस्टेट सोसायटीमधून ही दिले देण्यास प्रारंभ झाला आहे. याबाबतची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
याप्रसंगी विठ्ठलचे ज्येष्ठ सभासद आणि पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांच्यासह विठ्ठलचे संचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
*विठ्ठलला बाहेर काढण्यासाठी वापरली स्वतःची पत*
विठ्ठल कारखान्याची पत संपुष्टात आल्याने कारखान्यास कर्ज मिळत नव्हते याकरता अभिजीत पाटील यांच्या नांदेड आणि उस्मानाबाद येथील खाजगी कारखान्यावर कर्ज काढण्यात आले हे कर्ज पीपल्स मल्टीस्टेट सोसायटीमध्ये डिपॉझिट करण्यात आले पीपल्स कडून हाच पैसा विठ्ठल कारखान्याकडे वळवण्यात आला यामुळेच शेतकऱ्यांची थकीत देणी देणे आज रोजी शक्य झाले आहे.
*गळीत हंगामाची तयारी झाली*
विठ्ठल कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. आजपर्यंत 13 हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. ४५० ट्रॅक्टर, ३५० मिनी ट्रॅक्टर तसेच २२५ बैलगाड्यांचे करार पूर्ण करण्यात आले आहेत. चालू गळीत हंगामात हा कारखाना दर दिवशी दहा हजार उसाचे गाळप करण्याची क्षमता राखून आहे.