*भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुरेश अंबुरे सर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.* *रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद*. *विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

करकंब /प्रतिनिधी :-
शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष व धनश्री उद्योग समूहाचे चेअरमन श्री.सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे सर यांचा वाढदिवस बार्डी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास तरुण व ग्रामस्थ यांनी भरभरून प्रतिसाद देत रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यात असताना सुरेश अंबुरे सर यांचा विशेष सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वेरीचे संस्थापक प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सर यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक करत अंबुरे सर यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अंबुरे सरांना शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख - सुधाकरकाका कवडे, मा.जि.प.सदस्य - बाळासाहेब देशमुख, भाजपाचे अजय जाधव, लक्ष्मण वंजारी, पत्रकार - मनोज पवार, राहुल केदार, सलीम बागवान, रयत क्रांतीचे नंदकुमार व्यवहारे, बार्डी गावचे मा.सरपंच मोहन पाटील, मा.सरपंच दादाभाई पटेल, उद्योजक आयुब पटेल, हिम्मत काका कवडे, अॅड.शंकर बनसोडे, रामचंद्र (भाऊसाहेब) कवडे, शहाजी खंदारे, गोपाळबापू लांडे, बनसोडेतात्या, मा.तंटामुक्ती अध्यक्ष - कांतीलाल वसेकर, भाऊसाहेब नाईकनवरे, अमर सय्यद, शकुर मुलाणी, विलास माळी, गायकवाड सर, राहुल बनकर, दत्ता कवडे, हनुमंत बनकर, दशरथ बनकर, गोरख लाटे, विजय शिंदे, दादा लांडे, पोपट खंदारे, संतोष सुतार, रणजित लांडगे,हरी खंदारे, हर्षद माने आदी मान्यवरांसह बार्डी-करकंब परिसरातील बहुसंख्य तरुण, ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बार्डी गावचे पोलीस पाटील अॅड.नानासाहेब शिंदे सर यांनी मानले.