*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व्यवसाय मेळावा* *राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्या बारामती येथील मेळाव्यास उत्तम प्रतिसाद*

पंढरपूर/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग यांचे वतीने सुपे ता .बारामती येथे नवीन युवा उद्योजक, उद्योजिका , शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग बारामती तालुका व शहर यांचे वतीने व्यवसाय मेळावा आयोजित केला होता
. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष श्री नागेश फाटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना युवक व युवती यांनी नोकरीच्या मागे न लागता छोट्या मोठ्या उद्योगापासून आपल्या व्यवसायाची . सुरुवात करावी त्यासाठी सर्व प्रकारची मदत उद्योग व व्यापार विभाग तसेच आमची संपूर्ण टीम आपणास सहकार्य करण्यास तयार आहे . सुपे हे चिंचेचे आगार आहे त्यावर देखील प्रक्रिया उद्योग करता येतात . शासनाची बऱ्याच उद्योगांना सबसिडी मिळते आपण आमच्याकडून अशा उद्योगधंद्याची माहिती घेऊन व्यवसायात उतरावे हा भाग म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा तसेच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब व खा . सौ . सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघातील असल्यामुळे आपण नशीबवान आहात. आपण कुठल्याही उद्योगाचे सुरुवात केली तर या वरिष्ठांचे आपणास सहकार्य लाभणार आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष *मा . श्री जयंतराव पाटील साहेब यांचेही प्रत्येक सेल व कार्यकर्त्यावर विश्वास व लक्ष असून असे व्यवसाय मेळावे प्रत्येक तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत असे प्रदेशाध्यक्ष श्री नागेश पाटील यांनी सांगितले .
यावेळी मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सदस्य *श्री .पी टी काळे व उद्योग व व्यापार विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष गव्हाणे यांनीही मार्गदर्शन केले . कोरोना काळात ज्या व्यक्तीं निराधार झालेल्या आहेत व त्यांच्या कुटुंब प्रमुखांनी घेतलेले कर्ज असल्यास ते माफ करण्यासाठी उद्योग व व्यापार विभागाने पाठपुरावा केल्यामुळे ते माफ करण्यात आले आहे व वेगवेगळ्या फायनान्स मार्फत केले जाणारे अर्थसाह्य त्याची व्याजदराची टक्केवारी खूप जास्त असून एखादा हप्ता चुकल्यास गुंडा मार्फत तगादा लावला जातो याही गोष्टीचा पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. श्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे करणार आहोत .
हा व्यवसाय मार्गदर्शन मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग बारामती यांच्या वतीने आयोजित केला होता .यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या . यावेळी प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री पंकज सावंत, बारामती ता . अध्यक्ष श्री .सुभाष चांदगुडे, शहराध्यक्ष श्री .वैभव शिंदे , शहर कार्याध्यक्ष श्री . किशोर सावंत, तालुका उपाध्यक्ष .श्री प्रकाश चांदगुडे शहर उपाध्यक्ष श्री .भारत जाधव यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते .