*भावी आमदार ...म्हणून रणजितसिंह शिंदे यांची सोशल मीडियात फोटो होतायत व्हायरल....!* *माढा- पंढरपूर विधान सभेसाठी अभिजीत पाटलांची ही चर्चा...*

करकंब /प्रतिनिधी
:-माढा -पंढरपूर विधान सभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पारंपारिक "बालेकिल्ला" आहे. याबाबत या बाले -किल्ल्यातून लोकप्रिय आमदार - "बबन दादा शिंदे " यांनी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर विधानसभा निवडणूक जिंकून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आज तागायतपणे शाबित ठेवला आहे. शिवसेना- भारतीय जनता पार्टीसह अनेकांनी टक्कर देऊनही या विधानसभेच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून हा बालेकिल्ला आजपर्यंत तागायतपणे शिवसेना भारतीय जनता पार्टीसह इतरांना काबीज करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे लोकप्रिय आमदार- बबन दादा शिंदे यांचे हेच मोठे "कौशल्य" या मतदारसंघात मानले जाते. गेल्या काही दिवसापासून आणि विशेषता लोकप्रिय आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य-"रणजीत सिंह शिंदे" यांच्या नुकत्याच असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियात माढा- पंढरपूर विधानसभेचे "भावी आमदार" म्हणून माढा -पंढरपूर मतदार संघातील गावा -गावातील नेते कार्यकर्ते व सामान्य लोकातून फोटो "सोशल मीडियात" व्हायरल होत असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून "भावी आमदार" म्हणून "रणजीत सिंह बबनराव शिंदे" हेच उमेदवार असल्याचे निश्चित मानले जात असल्याची चर्चाही सुरू आहे. त्याच अनुषंगाने गावा -गावात नेते ,कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे.
एकीकडे माढा -पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे "भावी आमदार" म्हणून रणजीत सिंह शिंदे यांची "सोशल मीडियात" चर्चा होत असताना तर दुसरीकडे याच माढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच श्री. विठ्ठल सहकारी कारखाना काबीज केलेल्या आणि "कारखाना" चालवणारा "माणूस" म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या "अभिजीत आबा पाटील" यांची चर्चा माढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात "भावी आमदार" म्हणून ही केली जात असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- "अभिजीत आबा पाटील" हे या माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची बोलले जात आहे. त्यामुळे या माढा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने "अभिजीत पाटील" यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद ,पंचायत समिती च्या होणाऱ्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून आगामी विधानसभेच्या दृष्टीने अभिजीत पाटील हे माढा -पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे "नेतृत्व" करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त राजकीय तज्ञातून व्यक्त केले जात आहे.