*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांची यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण* *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाची जबाबदारीतून   वरीष्ठ नेत्यांची मिळवली शाबासकी* *वर्षपूर्तीबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लिहिले गेले पत्र*

*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांची यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण*  *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाची जबाबदारीतून   वरीष्ठ नेत्यांची मिळवली शाबासकी*  *वर्षपूर्तीबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लिहिले गेले पत्र*

पंढरपूर/प्रतिनिधी

आज १४जुलै २०२२ श्री .नागेश एकनाथ फाटे यांच्यासाठी भाग्याचा दिवस आज बरोबर एक वर्षांपूर्वी देशाचे नेते आदरणीय खा . श्री . शरदचंद्रजी पवार साहेब, विधानसभा विरोधी पक्षनेते मा. आ. अजितदादा पवार साहेब ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा .आ .जयंतराव पाटील साहेब  ,संसदरत्न खा. सौ .सुप्रियाताई सुळे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते मा . श्री .कल्याणराव काळे साहेब ,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व मा. श्री .भगीरथ दादा भालके साहेब यांनी श्री नागेश फाटे यांच्यासारख्या  सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेल्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली त्याबद्दल प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे त्या बद्दल मनापासून शतशः हा आभार मानतो  श्री नागेश फाटे यांनी त्यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज एक वर्ष पूर्ण होत आहे पद मिळाल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच कोकण विभागात त्यामध्ये रत्नागिरी चिपळूण मध्ये अतिवृष्टी होऊन खूप मोठे आर्थिक नुकसान झाले यावेळी पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र राज्यातल्या कार्यकर्त्यांना मदतीचेआव्हान केले तातडीने केलेल्या आव्हानाची दखल घेत चिपळूण येथे पूरग्रस्तांना त्या भागाचे आ . मा . शेखर निकम साहेब यांना बरोबर घेऊन श्री नागेश फाटे यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची भरीव अशी मदत केली .
आपल्याला राज्याची एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी स्वीकारून कोरोनाचे संकट अजून संपले ही नसताना श्री नागेश फाटे यांनी मराठवाडा, विदर्भ, खान्देश ,उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मुंबई विभागाचा म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून पक्ष संघटन बांधले . महाराष्ट्र राज्यातल्या व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा ते गेले एक वर्षभर प्रयत्न करत आहेत .
तसेच पक्षांनी केलेली आव्हाने, महागाई आंदोलने, सामाजिक उपक्रम, विविध नेत्यांचे वाढदिवस अन्नदान करून श्री विठ्ठलाला दीर्घायुष्याचे साकडे घालून करीत आहेत .
पक्ष संघटन बांधणीसाठी कोरोना कालावधीत झूम मीटिंग द्वारे तसेच वर्षभरात राज्य कार्यकारणी मिटिंग, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची मीटिंग व पक्ष संघटन बांधणी याविषयी ते सतत प्रयत्नशील आहेतआपल्या भागातील तसेच महाराष्ट्र राज्यातल्या काही भागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागातील कामांचे निवेदन संबंधित मंत्री महोदय यांना देऊन ती कामे मार्गी लागण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत .तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे हजारो नवयुवकांना उद्योग व्यवसायासाठी सहकार्य व मार्गदर्शन या विभागामार्फत केले जात आहे .
 पक्ष संघटन बांधत असताना राज्य कार्यकारिणी मध्ये महाराष्ट्र राज्यातल्या 33 पदाधिकारी यांना विविध पदाची जबाबदारी सोपविली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातल्या ३० जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातल्या शहराध्यक्ष म्हणून १५ पदाधिकारी यांना काम करण्याची संधी तसेच जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष विविध भागाचे अध्यक्ष असे महाराष्ट्र राज्यात हजारो कार्यकर्त्यांना पदे देऊन महाराष्ट्र राज्यात पक्ष संघटन श्री नागेश फाटे यांनी वाढवले आहे . ही जबाबदारी देत असताना प्रत्येक आठवड्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहेत व पक्ष संघटने विषयी काय कार्य केले व कुठले सामाजिक उपक्रम राबवले याचा आढावा श्री नागेश फाटे हे घेत आहेत .
 हे लिहिण्या मागचे कारण मीही एक सर्वसामान्य कुटुंबातील राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता मलाही त्यांनी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिल्यामुळे मी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचा दौरा केला असल्यामुळे त्यांचे कार्य त्यांची पक्षाविषयी असलेली धडपड स्वतःहून अनुभवली आहे .श्री नागेश फाटे हे कोविड काळातही एक ही गोळी कधी घेतली नाही अगदी सक्षमपणे पदाचे जबाबदारी स्वीकारून कार्य केले . परंतु मागील पंधरा दिवसात महाराष्ट्र राज्यात जे  सत्तांतराचे नाट्य घडले त्यावेळी श्री नागेश फाटे यांनीअतिशय धसका घेऊन ते आठ दिवस आजारी पडले .सतत फोन करून सत्ता नाट्य घडले त्या बद्दल ते खूप मला व्यतीत दिसले .
अशा या राष्ट्रवादीच्या शिलेदाराला व  पक्षश्रेष्ठीला माझा मनापासून मानाचा मुजरा .. व पदग्रहण वर्षपूर्तीसाठी... 
राष्ट्रवादीमय  महाराष्ट्र वाटचालीसाठी श्री नागेश फाटे यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ..
    जय भारत ..
जय महाराष्ट्र ..
     जय राष्ट्रवादी ..