*उद्या कान्हापुरी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन* *आमदार बबनदादा शिंदे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांची प्रमुख उपस्थिती*.
करकंब/ प्रतिनिधी:
कान्हापुरी ता पंढरपूर येथे सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार बबनदादा शिंदे जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी करकंबपोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे जि प सदस्य रणजीत सिंह शिंदे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व उपसरपंच आदिनाथ देशमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद बाळासाहेब जाधव, पंचायत समिती सभापती , पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कान्हापुरी ता पंढरपूर येथे विविध विकास कामांमध्ये मोरे वस्ती रस्ता खडीकरण करणे, जाधव वस्ती ते भवानी मंदिर रस्ता खडीकरण, गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे बाबत, स्मशानभूमी रस्ता स्मशानभूमी हाय मास्ट दिवा, शिंदे वस्ती करोळे रस्ता सिमेंट रस्ता दलित सुधारणा योजना, भूमिगत गटार पिकअप शेड जि प शाळेत आर ओ प्लांट पेविंग बॉक्स अंगणवाड्यांना विद्युतीकरण लाईट, विविध विकास कामाचे उपक्रम राबवणार असल्याचे कान्हापुरी ग्रामपंचायतचे सरपंच प्रेम चव्हाण, उपसरपंच राजेंद्र शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व समस्त ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.