*आ समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम * *तात्या महाराज साळुंखे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप*

पंढरपूर/प्रतीनीधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले होते.
या कार्यक्रमामध्ये आदर्श आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, शहीद कुनालगिर गोसावी अंध शाळा येथे मिष्टान्न भोजन वाटप, मातोश्री वृद्धाश्रम येथे फळे वाटप, गोपळनाथ गोशाळा, गोपाळपूर येथे गाईना चारा वाटप, गरजूंना ब्ल्याकेट वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन, समर्थक कार्यकर्ते राहुल गावडे, गणेश दादा शिंदे नाईक, पांडुरंग वाडेकर यांनी आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती श्री.सोमनाथ आवताडे हे होते.सदरचा कार्यक्रम सुधीर उर्फ तात्या महाराज साळुंखे,नानासाहेब करकमकर,महेश मोटे, नगरसेक डी राज सर्वगोड, नगरसेवक भैया, सोनवणे,अमित कसबे,ad संदीप कागदे सर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी, संजय लवटे सर,सारंग कुंभार, भाऊसाहेब शिंडे नाईक,महेश कुंभार, सचिन आदमाने, धीरज साळुंखे, सोमेश परचंडे, निलेश जाधव रवींद्र सुर्वे, गोरख पांढरे, बापू साहेब घोडके, भास्कर घायाळ, प्रथमेश बागल, अनिकेत देशमुख अभिजित मोरे, आदी मान्यवर शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल गावडे यांनी केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तात्या महाराज साळुंखे यांनी केले.