*करकंब पंचायत समितीसाठी प्रहार जन पक्षाकडून महेंद्र लोंढे यांची उमेदवारी जाहीर*

*करकंब पंचायत समितीसाठी प्रहार जन पक्षाकडून महेंद्र लोंढे यांची उमेदवारी जाहीर*

 
करकंब /प्रतिनिधी:

-आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्य मंत्री आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जन पक्षाकडून नुकत्याच झालेल्या सोलापूर येथे बैठकीमध्ये करकंब येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे शाखा अध्यक्ष महेंद्र लोंढे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे सोलापूर प्रहार जन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के सांगितले.यावेळी पंढरपूर तालुका दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता चौगुले शहराध्यक्ष उमेश गोडसे, बाळू पेटकर दत्ता धायगुडे प्रकाश शिंदे आदीसह बहुसंख्य प्रहार जन पक्षाचे व प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 आगामी होऊ घातलेल्या या पंचायत समिती निवडणुकीमध्ये करकंब पंचायत समिती गणातून सर्वसामान्य वंचित असलेल्या घटकांना तसेच तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या समस्या निश्चित पणाने प्रयत्न करणार असून कोणत्याही परिस्थितीत करकंब पंचायत समिती गणातून उमेदवारी लढविण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे  भावी पंचायत समिती सदस्य , करकंब शाखा अध्यक्ष महेंद्र लोंढे यांनी सांगितले.