*करकंब जिल्हा परिषद गटात शिवसेना व युवासेनेची आढावा बैठक संपन्न...

..
करकंब/ प्रतिनिधी
:-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने करकंब जिल्हा परिषद गटातील शिवसेना व युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची करकंब सह जिल्हा परिषद गटात शिवसेना जिल्हाप्रमुख (पंढरपूर विभाग) संभाजी राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश नाना साठे यांनी समक्ष गाठीभेटी घेऊन करकंब येथे नियोजित आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीमध्ये आगामी करकंब जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील निवडणुकीसंदर्भात चर्चा विनिमय, शाखा उद्घाटन, व शिवसेने वतीने राबवण्यात आलेल्या योजनेच्या बाबत सर्वसामान्य लोकांना माहिती व त्याबाबत जनजागृती करण्याबाबत बैठक घेण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश नाना साठे, शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य संतोष मामा धोत्रे, युवा सेना अध्यक्ष रणजित कदम, दत्ता पेटकर दत्ता शिंदे बंडू घोडके, आदी पदाधिकारी सह शिवसैनिक तसेच प्रेम कांबळे बापू लोंढे सचिन लोंढे स्व. दत्ता खारे सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य रमेश खारे सर आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.