*पांडुरंग कारखाना गाळपाविना राहिलेल्या ऊसाला ही २७००रुपये दर देणार:-मा आ प्रशांत परिचारक* *नेमतवाडी ग्रामस्थ व पांडुरंग परिवार च्या वतीने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत मालक परिचारक व उपाध्यक्ष पदी कैलास खुळे सर यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार......!*

*पांडुरंग कारखाना गाळपाविना राहिलेल्या ऊसाला ही २७००रुपये दर देणार:-मा आ प्रशांत परिचारक*     *नेमतवाडी ग्रामस्थ व पांडुरंग परिवार च्या वतीने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत मालक परिचारक व उपाध्यक्ष पदी कैलास खुळे सर यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार......!*

करकंब /प्रतिनिधी:
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शवत चाकोरीने पांडुरंग कारखाना सुरू असून जवळपास २००दिवस गाळप हंगाम सुरू आहे नोंद दिलेल्या सभासदांचा ऊस गाळप केला आहे, यातून एक गुंठा ऊस जरी  गाळपाविना राहिला तर त्या ऊसाला ही २७००रुपये प्रमाणे दर देणार असल्याचा विश्वास पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष मा आ प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

नेमतवाडी (ता पंढरपूर) येथे पांडुरंग परिवाराच्या व नेमतवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते . यावेळी इटोपीयन चे चेअरमन उमेश परिचारक, दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप चव्हाण, डॉ बी पी रोंगे, नागेश भोसले, बाळासाहेब देशमुख, विवेक कचरे, लक्ष्मण धनवडे, यशवंत कुलकर्णी, कैलास खुळे, राहुल पुरवत, भगवान चौगुले, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे आदींसह पांडुरंग साखर कारखान्याचे खातेप्रमुख, कामगार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आ परिचारक म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना प्रभावी पणे राबवली व पाऊस ही चांगला झाला त्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात झाली आहे, तर इतर देशात दुष्काळ पडला आहे, त्यामुळे साखरेला दर चांगला मिळत आहे, पांडुरंग कारखान्याने या हंगामात विक्रमी साडेबारा लाख टन ऊस गाळप केला असून रिकव्हरी ही जिल्ह्यात एक नंबर आहे.भविष्यात प्रत्येक सभासदांना ऊस बेणे कारखाना देईल, त्यादृष्टीने आपण वाटचाल करीत आहे.

प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष कैलास खुळे म्हणाले, नेमतवाडी गावाने परिचारक कुटुंबाला नेहमी साथ दिली असून कौटुंबिक सुखाबरोबर राजकीय सुख मिळत असल्याने समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दाजी पाटील, दिलीप चव्हाण यांनी ही मनोगत व्यक्त केले.

चौकट
पांडुरंग परिवाराकडे असलेल्या सर्व संस्था सुरळीत चालू केवळ नेतृत्व भक्कम असल्याने आहेत, परिचारक यांच्याकडून नेहमी निष्टावंत कार्यकर्त्यांनी संधी दिली जात आहे.