*"श्री विठ्ठल"मधील ॲडव्हान्स रक्कमेह इतर आर्थिक व्यवहारांची सत्यता अभिजीत पाटील यांनी सभासदांसमोर जाहीर करावी :- अमरजित पाटील.*

*"श्री विठ्ठल"मधील ॲडव्हान्स रक्कमेह इतर आर्थिक व्यवहारांची सत्यता अभिजीत पाटील यांनी सभासदांसमोर जाहीर करावी :- अमरजित पाटील.*

पंढरपूर /प्रतिनिधी .

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान नुतन चेअरमन अभिजीत पाटील यांनी निवडणुक काळामध्ये कारखान्याच्या श्री विठ्ठल स. सेवा संघामार्फत देण्यात आलेल्या १०९ कोटी रुपयाच्या बेकायदेशीर ॲडव्हान्सचा मुद्दा मांडलेला होता.चेअरमन निवडी नंतर त्यांनी आपल्या या मुद्द्याचा पुर्न:उच्चार केलेला आहे.यावर माजी चेअरमन भगिरथ भालके यांनी पत्रकार परिषद घेत ॲडव्हान्स पोटी दिलेल्या रक्कमेचा आकडा येवढा मोठा नसल्याचे सांगत चेअरमन अभिजीत पाटील यांचे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.यामुळे ॲडव्हान्सच्या नेमक्या रक्कमेबाबत श्री विठ्ठल सहकारीच्या सर्वसामान्य शेतकरी - सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

चेअरमन अभिजीत पाटीलांच्या १०९ कोटीच्या ॲडव्हान्स रक्कमेच्या वसुलीबाबत भुमिका समोर आल्यानंतर माजी चेअरमन भगिरथ भालके यांनी मांडलेल्या भुमिकेमुळे,आता श्री विठ्ठल सहकारीचा १०९ कोटी ॲडव्हान्स असणार्‍या लोकांची आणि संस्थांच्या नावांची थकित रक्कमांसह यादी सर्व सभासद शेतकर्‍यांसमोर जाहीर करण्याची नैतिक जबाबदारी चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर आलेली आहे.ती त्यांनी जाहीर करावी व बेकायदेशीरित्या ॲडव्हान्स म्हणून कारखान्याचे पैसे वापरणार्‍या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.अशी आम्ही मागणी करित आहोत.

तसेच,माजी चेअरमन भगिरथ भालके यांनी निवडणुक काळात कारखान्यावरुन आपल्या व इतर व्यक्तींच्या नावावर घेऊन गेलेल्या रक्कम रुपये १९ लाख रुपयेच्या व्यवहाराची सत्यता सभासदांसमोर यावी..त्याच बरोबर व्यंकट भालके यांना रोख व्हाऊचर द्वारे देण्यात आलेल्या १ कोटी ५ लाखाच्या व्यवहाराची ही सत्यता सर्वसामान्य सभासद - शेतकर्‍यांसमोर विद्यमान चेअरमन अभिजीत पाटील यांनी आणून आपले पाय मातीचे नाहीत.हे दाखवून द्यावे.व न्यायाचा तराजू घट्ट धरुन कठोर भुमिका घ्यावी.आपल्या राजकीय महत्वकांक्षेपायी सदर न्यायाचा तराजू सैल पडू नये.या अपेक्षेसह आम्ही वरील मागण्या करित असल्याचे अमरजित पाटील यांनी सांगितले आहे.