*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांची निवड*,,,,.  

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांची निवड*,,,,.  

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील  सचिन आटकळे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या अगोदर त्यांनी जनहित शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदांची जबाबदारी पार पाडली होती,नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत रांजणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता.
सचिन आटकळे यांचे कार्य हे शेतकरी हिताचे असून लहानपणापासून त्यांनी  शेतकरी चळवळीसाठी योगदान दिले आहे.
२०१७ ला ऊस दरासाठी राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्याच्या गव्हाणीत उडी केलेले आंदोलन राज्यभर गाजले होते

.

शेतकर्यासाठी ऊस दर ,दूध आंदोलन,शेतकरयांना पीक विमा मिळावा, अतिवृष्टी झालेल्या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी,पुरग्रस्तासाठी  उपोषणे, निवेदने ,शेतकरयांना ठिंबक सिंचनाचे अनुदान, कर्जमाफी मिळावी,बंधारे गळती,पीक कर्ज मिळावे, रोजगार हमी योजना अंमलात आणावी,उजवा डावा कॅनलग्रस्त शेतकरयांना हक्काचे पैसे मिळावेत अशा अनेक आंदोलनात सक्रीय असून शेतकरयांना न्याय मिळावा म्हणून ते शेतकरी चळवळीत काम करत आहेत. त्यांनी केलेले  कार्य उल्लेखनीय असून यांची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी साहेब यांनी घेऊन आज त्यांची भोसे  येथे कार्यकर्ता बैठकी मध्ये निवड करण्यात आली.या निवडी वेळी  जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील,शहजान शेख,रायाप्पा हळणवार, रणजित बागल,अमर इंगळे,अॅड.विजयकुमार नागटिळक,   नानासाहेब चव्हाण,अॅड.अजिक्य नागटिळक,अतुल नागटिळक, कांताभाऊ नाईकनवरे,मोरे मामा,नामदेव कोरके,शिवाजी सावंत  दादासाहेब कधाळे, दशरथ गोडसे, संतोष काटे ,मनोज गावंधरे आदि शेतकरी उपस्थित होते.त्यांच्या निवडी बद्दल सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.