*करकंब येथील श्री संत रोहिदास प्रतिष्ठान च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!*

करकंब /प्रतिनिधी:-
येथील श्री संत रोहिदास नगर येथील श्री संत रोहिदास प्रतिष्ठान करकंब यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.
सुरुवातीस क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भावी पंचायत समिती सदस्य पैलवान औदुंबर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, शिवराज शिंदे संतोष राजगुरू अनिल शिंदे तुकाराम शिंदे दिनेश कांबळे आमीन बागवान आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.