*ग्राहक संरक्षक समितीच्या शहर अध्यक्षपदी जयलक्ष्मी माने यांची निवड *

*ग्राहक संरक्षक समितीच्या शहर अध्यक्षपदी जयलक्ष्मी माने यांची निवड *

पंढरपुर :   अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान  संघटन (अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संघटना ) अंतर्गत ग्राहक संरक्षण पंढरपुर शहर अध्यक्षपदी जयलक्ष्मी माने यांची निवड करण्यात आली. 

 सोलापूर जिल्ह्यातील महिला आघाडी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत  पदधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या.  अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती ही शासन मान्य असून पंजिकृत आहे.  ग्राहकांच्या हितासाठी सदर समिती काम करीत असुन, पंढरपूर तालुक्यातील ग्राहकांना होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्याचे काम करीत  आहे.  त्यामुळे पंढरपूरमध्ये आता सर्वसामान्य लोकाना फसवणे सोपे राहिले नाही तक्रार तुमची आणि कार्यवाही आमची असे या संघटनेचे ब्रीद वाक्य आहे. यावेळी  राज्य संघटक संजय जाधव उपस्थित होते.  कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचेच्या युवती जिल्ह्याध्यक्षा श्रेया ताई भोसले उपस्थित होत्या. यावेळी  जिल्ह्याध्यक्षपदी  संगीता साबळे, जिल्हा उपाध्यक्ष शगुफता तांबोळी, शहर अध्यक्ष जयलक्ष्मी  माने,  शहर उपाध्यक्ष श्वेता साबळे, तालुकाध्यक्षा माधुरी जाधव, तालुका उपाध्यक्षा  सुनीता शिंदे, सचिव स्मिता देठे आदींच्या निवडी करण्यात आल्या