* करकम्ब येथे विविध संस्था, शाळा प्रशाला महाविद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

करकंब/ प्रतिनिधी.
करकम्ब येेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मध्ये विविध समाजसेवी संस्था, शैक्षणिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय ,अण्णाभाऊ साठे नगर ,सिद्धार्थ नगर, याठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले ,या महामानवाला अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले सिद्धार्थ नगर मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु व उपसरपंच आदिनाथ देशमुख माजी पंचायत समिती सदस्य राहुल पूर्ववत एडवोकेट शरदचंद्र पांढरे ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे विवेक शिंगटे आरपीआय नेते प्रदीप खंकाळ शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे नागनाथ गायकवाड महेंद्र शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फक्त एका जातीपुरते ना काम करता अख्ख्या विश्वास व समाजाच्या हिताचे काम करणारे राज्यघटना लिहून व समाज सुधारला पाहिजे मुलांनी वाचन व शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे नगर येथे करकम पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार कैलास हरिहर जाडकर सोमनाथ गायकवाड शशी गायकवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.