*प. महाराष्ट्रातील दौऱ्यासाठी पुणे जिल्ह्यातून सुरुवात* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या जिल्हा बैठका पुन्हा सुरु* 

*प. महाराष्ट्रातील दौऱ्यासाठी पुणे जिल्ह्यातून सुरुवात*  *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या जिल्हा बैठका पुन्हा सुरु* 

पंढरपूर/प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आपले राज्यभर दौरे सुरू केले आहेत, मागील काही दिवसांपूर्वी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, आदी भागाचा जिल्हानिहाय बैठका घेऊन ,संघटन मजबूत करण्यासाठी तयारी केली आहे. त्यानंतर आता प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय दौऱ्यास सुरुवात केली असून याची सुरुवात उद्योगनगरी असलेल्या पुणे जिल्ह्यातून करण्यात आली आहे.
    . प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष पुणे (शहर )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अध्यक्षते खाली उद्योग व व्यापार सेलची आढावा बैठक संपन्न झाली
     यावेळी उद्योग व व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष मा .श्री नागेश फाटे यांनी पक्षसंघटन विषयी चर्चा केली.


    तसेच मा .श्री प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पुणे (ग्रामीण ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची भेट घेऊन पक्ष संघटन विषयी चर्चा करून               जिल्हाध्यक्ष ,शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी नूतन पदाधिकारी नियुक्त करून पक्ष संघटन बळकट करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवने याविषयी चर्चा करून येथील व्यापारी  वर्ग व महिला व्यापारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन पक्षसंघटन वाढवणे ,त्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे, जीएसटी  संदर्भातील प्रश्न सोडवणे पर्यावरण पूरक मच्छी उद्योग या व्यवसायाला चालना देणे, तरुण वर्गांना महामंडळामार्फत इन्कम सोर्स उपलब्ध करून देणे, त्यांना रोजगाराच्या संधी देणे, तसेच या सेलची वेबसाईट उपलब्ध करणे, आणि पुणे शहर जिल्हा उद्योग व्यापारात अग्रगण्य असल्याने येथे जम्बो कार्यकारिणी तयार करणे, याविषयी . चर्चा करण्यात आली.
        यावेळी बाळासो करगळ, भोलासिंग अरोरा उद्योग व्यापार सेल पुणे माजी शहराध्यक्ष, वीरेंद्र किराड माजी कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार सेल पुणे शहर, अॅड . निलेश निकम, महेश हांडे पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
   पिंपरी चिंचवड येथे मा .श्री संजोग वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड (शहर )जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अध्यक्षतेखाली मा . श्री नागेश फाटे उद्योग-व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष यांनी आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी, पक्षसंघटन विषयी सविस्तर चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे व पक्षाचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवून पक्षसंघटन वाढवणे या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली 
  यावेळी मा . श्री अरुण बोराडे मुख्य संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड , मा . शकुला पठाण अध्यक्ष व्यवस्थापन सेल, मा .श्री संतोष वाघेरे उपाध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड, मा. श्री विजय पिरंगुटे अध्यक्ष जय गणेश साम्राज्य व्यापारी मंडळ भोसरी, मा. श्री अॅड.गोरख लोखंडे अध्यक्ष लिगल सेल पिंपरी चिंचवड, मा. श्री सुरेश लोंढे मा. श्री कल्याण कुसूमडे पंढरपूर ता . उपाध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते.