*करकंब येथे प्रणव परिचारक युवा मंच च्या वतीने गौरी गणपती आरास स्पर्धा संपन्न*

करकंब /प्रतिनिधी
: प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने ऑनलाइन गौरी गणपती स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच युवा नेते प्रणव परिचारक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रीतम नकाते, अनिल शिंदे अरुण बनकर औदुंबर कुंभार हनुमंत खैरे अक्षय नकाते अक्षय खारे संजय शेटे नारायण खारे सतीश बनकर आदी उपस्थित होते. मान्यवर विजेते मनीषा विशाल रेपाळ, सायली संजय शेटे, आरती नितीन देवळे, मनीषा नितीन शेटे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.