*उद्योजक राजू खरे यांच्या भूमिकेकडे लक्ष!* *मोहोळ विधानसभा मतदार संघात मोठी ताकद* *मागेल त्याला पाणी, रस्ता अन् शिक्षण,आरोग्यासाठी केलेल्या मदतीमुळे मोठा मतदार खरे यांच्या पाठीशी

पंढरपूर/प्रतिनीधी
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराकडून विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. याच मतदार संघातून मोहोळ विधानसभा मतदार संघातून पंढरपूरचे सुपुत्र उद्योजक राजू खरे यांची मोठी ताकद आहे. यामधून पंढरपूर,मोहोळ आणि उत्तर सोलापूर या भागातील मतदारांचा समावेश आहे. तर या लोकसभा निवडणुकीत ही ताकद नेमकी कोणाच्या बाजूने जाणार? यासाठी खरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
मागील आठ वर्षापासून मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी उद्योजक राजू खरे हे प्रयत्नशील आहेत. मोहोळ मतदार संघात राजू खरे यांचा मोठा गाजावाजा झाला आहे. गावोगावी त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. त्यामुळे खरे यांचा स्वतंत्र राजकीय गट तयार झाला आहे.
उद्योजक राजू खरे यांनी आपल्या मोहोळ विधानसभा मतदार संघासह पंढरपूर विधानसभा मतदार संघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागातील मंत्र्यांकडून कोट्यवधीचा निधी मिळविला आहे. त्यामुळे अनेक भागात विकासकामे सुरू आहेत.
मोहोळ विधानसभा मतदार संघात येत असलेल्या मोहोळ,पंढरपूर, उत्तर सोलापूर भागातील जनतेसाठी खरे यांनी मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता देण्याची महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. याचबरोबर आरोग्य सेवेसाठी मोठी आर्थिक मदत करीत विविध शाळेसाठीही लाखो रुपयांची मदत मिळवून दिली आहे. यामधून मोहोळ मतदार संघातील बहुसंख्य गावातून वरील मदत पोहचली आहे. त्यामुळे राजू खरे यांना मानणारा मोठा प्रमाणात वर्ग तयार झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक ते कोणत्या पक्षाकडून लढविणार आहेत. याबाबत कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी खरे यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे असलेले मताचे मोठे वजन कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे खरे समर्थक यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजू खरे हे मागील अनेक वर्षापासून कडवट शिवसैनिक आणि चळवळीत वाढलेले नेतृत्व आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या अंगी आहेत. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून सर्वशृत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनीही खरे यांना आमदार नसतानाही स्वतंत्र खास बाब म्हणून निधी दिला आहे. त्यामुळे खरे यांची ताकद या लोकसभा मतदार संघात कोणाच्या बाजूने झुकणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
*लोकसभा निवडणुकीत अलिप्त भूमिका !*
मोहोळ विधानसभा मतदार संघात हजारो मतदार पाठीशी असताना. उद्योजक राजू खरे यांनी लोकसभा निवडणुकीत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून आले नाही. अनेक गोरगरीब जनता खरे यांच्या पाठीशी आहे. ज्याला नाही कोणी त्याला आहे राजू खरे ही अवस्था असलेल्या जनतेला राजू खरे आपली भूमिका कधी सांगणार आहेत. यासाठी कार्यकर्त्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत सद्याची परिस्थिती पाहता या लोकसभा निवडणुकीत खरे यांची भूमिका अलिप्त राहणार असल्याचेच चित्र जाणवत आहे. तरीही यापुढील काळात खरे कोणती भूमिका घेणार हे लवकरच समजणार आहे.