*सहकार शिरोमणी* वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस पुरवठादार व ऊस वाहतूकदार यांच्या मागणीप्रमाणे *मा.संचालक मंडळात दराचे धोरण निश्चित.* :*चेअरमन, कल्याणराव काळे*

पंढरपूर:/प्रतिनिधी
*गळीत हंगाम 2021-22 मध्ये कारखान्याकडे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळाने एकुण प्र.मेट्रिक टन रु.2300/- दर जाहीर केला आहे. पैकी पहिला हप्ता रु.2000/- पंधरवडावाईस बिले देण्यात येणार असून,उर्वरित बिलाची रक्कम दोन टप्प्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.*
*प्रचलित ऊस वाहतूक दरामध्ये 13 टक्के दरवाढ करून पंधरवडा वाईज बिले अदा करण्यात येतील.*
*सन 2020-21 मध्ये ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. त्यांची एफ आर पी प्रमाणे ऊस बिले शुक्रवार पासून संबंधितांचे बँक खात्यावर गटवार जमा करण्यात येणार आहेत.*
*तरी कृपया सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व वाहतूकदार यांनी याची नोंद घेऊन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2021-22 करिता जास्तीत जास्त ऊस गळीतास देवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.*