*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटानचा जिल्हास्तरीय पुरस्कार -अर्चना कोळी यांना पुरस्कार प्रदान.* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत सत्यशोधक जिल्हास्तरीय शिक्षिका पुरस्कार.*

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटानचा जिल्हास्तरीय पुरस्कार -अर्चना कोळी यांना पुरस्कार प्रदान.*  *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत सत्यशोधक जिल्हास्तरीय शिक्षिका पुरस्कार.*

करकंब/ प्रतिनिधी:

- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, सोलापूर. अंतर्गत प्रोटॉन (प्रोफेसर टीचर्स अँड नॉन टिचिंग विंग) च्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सत्यशोधक जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुपली .च्या मुख्याध्यापिका - अर्चना शंभूदेव कोळी यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
      हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 29 /1 /2023 रोजी दुपारी- एक वाजता , डॉक्टर निर्मूलकुमार फडकुले सभागृह डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ सोलापूर. येथे प्रोटॉन (प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ) चे राष्ट्रीय अध्यक्ष - वामन मेश्राम. यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका - अर्चना शंभूदेव कोळी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिसह कुटुंब- सहपरिवार यावेळी उपस्थित होते.