*कान्हापुरी होतेय 100% लसीकरणा कडे वाटचाल.....*! *सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामुळे विक्रमी लसीकरण*

करकंब /प्रतिनिधी
कान्हापुरी ता पंढरपूर हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव असून कान्हापुरी चे सरपंच प्रेम भैया चव्हाण यांनी लोकसहभागातून व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तसेच वेळोवेळी लसीकरणाची माहिती देऊन व लोकांच्या सहभागातून गावामध्ये कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार कोविड ची टेस्ट घेऊन लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभा साखरे आरोग्य सेवक लादे त्यांचा सर्व स्टॉप, आशा वर्कर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कान्हापुरी हे गाव आता शंभर टक्के लसीकरणा कडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कान्हापुरी गावाचे परिसरातील गावातून विशेष कौतुक होत आहे.
कान्हापुरी येथे आज 190 टेस्ट घेण्यात आल्या होत्या 190 पैकी 190 टेस्ट हे सर्व निगेटिव्ह आले असून या सर्वांनी लसीकरण करून घेतले.