*करकंब ग्रामपंचायतच्या वतीने विक्रमी लसीकरण केल्याबद्दल विशेष सत्कार....*!

करकंब/ प्रतिनिधी
करकंब ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर व सर्व स्टाफ तसेच आशा वर्कर यांनी विशेष परिश्रम घेऊन चांगल्या पद्धतीने लसीकरण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतचे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या शुभहस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सरवदे यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक लादे, संगणक चालक सूर्यकांत कुरणाळ, बापू गायकवाड, रोहन आणि या लसीकरणा मध्ये सहभागी झालेल्या अशा वर्कर यांचा विशेष योद्धा म्हणून सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट शरदचंद्र पांढरे, राहुल शिंगटे, सचिन शिंदे, शिंगटे, ग्राम विकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण, आदी उपस्थित होते.
नागरिकांना लस देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या करकब ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विजय मस्के, विशाल देशमुख, फिरोज बागवान, गोवर्धन चव्हाण, संजय पांढरे, तेजस वाघमारे, संभाजी खंदारे आदींनी विशेष परिश्रम घेतले