ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या वतीने विविध उपक्रम

ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या वतीने विविध उपक्रम

पंढरपूर: प्रतिनिधी

प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक   ना.बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज इस्बावी, सुगाव, तारापूर ,टाकळी ,विठ्ठल वाडी ,करमाळा तालुक्यात पुनर्वसन गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्याच बरोबर अनाथ व गरजूंना साड्या वाटप करण्यात आल्या.

ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रहार धरणग्रस्तांची शाखेचे सुली, तारापूर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष  रणजीत जगताप जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मदेव आरकिले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नागनाथ देडगे ,संघटनेचे मार्गदर्शक राजेंद्र आरकिले, सज्जन पूरी, तालुका कार्यकारणी सदस्य भास्कर सौंदणे,  प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हा सचिव संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य समाधान गाडे, संघटनेचे तालुका उपाध्यक्ष  सुहास कदम, शाखाध्यक्ष प्रकाश शिंगाडे, उपाध्यक्ष राजू देवकर,

खजिनदार गणेश देडगे, सचिव भूषण पवार, बालाजी शिंदे, विजय उंबरकर, महेश जगताप, आबा देवकर, निलेश जगताप, बालाजी कदम, ज्ञानदेव कदम, विष्णू जगताप, शंकर सौंदाणे, जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष शेंडगे,  पांडुरंग पडगळ, महावीर देडगे, आदि धरणग्रस्त बांधव उपस्थित होते .यावेळी ना. बच्चुभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.