*महाराष्ट्रातील आरक्षणाबाबत आवाज दिल्लीत घुमला*! *खा. निंबाळकर यांनी मराठा आणि धनगर समाजासाठी लावून धरली मागणी*
पंढरपूर/प्रतिनीधी
राज्यात सध्या आरक्षण मागणीमुळे वातावरण अक्षरशः ताण तणावाचे झाले आहे.अशातच मराठा व धनगर आरक्षणासाठी लोकसभेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आवाज उठविला आहे.याबाबत लवकरच समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 33 टक्के आहे सध्या मराठा समाज अडचणीत सापडला आहे. म्हणून मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकसभा अधिवेशनात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
लोकसभेत प्रश्न उपस्थित करताना खासदार निंबाळकर म्हणाले 25 वर्षांपूर्वी मराठा एका कुटुंबाकडे 25 एकर शेतजमीन होती. आता ती दोन एकरवर आली आहे. यामुळे कुटुंब चालविताना अडचणी येत आहे. सध्या तरुणांना नोकरी हवी असेल तर उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता आहे .मात्र अनेक कुटुंबाकडे पैसा नसल्याने शिक्षणापासून तरुणांना वंचित रहावे लागत आहे .महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या 33% आहे यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, तसेच महाराष्ट्रातील धनगर व धनगड ही एकच जात आहे. मात्र महाराष्ट्र बाहेर धनगर समाजाला आरक्षण दिले गेले आहे. परंतु महाराष्ट्रात मिळत नाही तरी या समाजाला आरक्षण मिळावे. महाराष्ट्रात मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी खास बैठक घेण्यात यावी, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे. आता केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.