*आगामी  निवडणुकीत विठ्ठल परिवाराची दिसणार एकीच!*  *माढा -पंढरपूर मतदार संघाचा आमचाही अभ्यास पूर्वीचाच* *चेअरमन कल्याणराव काळे यांचा वार्तालाप प्रसंगी मनमोकळेपणाने खुलासा* 

*आगामी  निवडणुकीत विठ्ठल परिवाराची दिसणार एकीच!*   *माढा -पंढरपूर मतदार संघाचा आमचाही अभ्यास पूर्वीचाच*  *चेअरमन कल्याणराव काळे यांचा वार्तालाप प्रसंगी मनमोकळेपणाने खुलासा* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

 राज्यातील राजकारण वरचेवर अस्थिर होत चालल्याची राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने पावले टाकणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार एकत्रितरित्या दिसेल. पंढरपूर तालुक्यातील मतदार यांच्याकडून तब्बल चार आमदार निवडून दिले जात असतानाही याच तालुक्यातून एकही आमदार नसल्याची खंत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी व्यक्त केली आहे.
   पंढरपूर येथील घेण्यात आलेल्या वार्तालाप प्रसंगी काळे यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी वरील खंत व्यक्त केली आहे.
    पंढरपूर शहर हे अत्यंत जबाबदारीचे ठिकाण आहे. त्यासाठी येथील विकास साधण्यासाठी आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यासाठी महायु्तीकडून राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीची मागणी करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीतील विविध आमदारांनी  आमदारकीसाठी सहमती दिली आहे. असेही काळे यांनी यावेळी सांगितले.
     सध्या महायुतीकडून राज्यातील सर्व जागांचे वाटप लवकरच जाहीर होईल. विद्यमान आमदारांना त्या त्या मतदार संघात त्या त्या पक्षातून उमेदवारी मिळणार आहे. असा फॉर्मुला ठरणार आहे. तरीही माढा मतदार संघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचेकडून आगामी विधानसभा महायुतीकडून न लढविण्याचा पवित्रा असल्याचे सोशल मीडियातून ऐकावयास मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी जर कोणी  नकार देत असेल तर  आपली तयारी असल्याचेही काळे यांनी सांगून टाकले आहे. यामुळे बडा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
    माढा विधानसभेची निवडणूक आपल्यासाठी नवीन नाही. 2014चे विधानसभा निवडणुकीत आपण अचानकपणे त्या भागातील लोकांनी मला दोन नंबरची मते दिली आहेत. या भागामध्ये आपल्या राजकारणातील  अनेक गावांचा समावेश आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या विचारातून माढा विधानसभा निवडणूक लढवणे आमच्यासाठी अडचणीचे ठरणार नाही. असा स्पष्ट खुलासा करीत काळे यांनी तयारी दर्शविली आहे . 

     
चौकट

*ऊस दर जाहीर करण्याची परंपरा बिघडविली*


आपल्या तालुक्यातून जुन्या साखर कारखानदार म्हणजेच कर्मवीर औदुंबर अण्णा, कर्मयोगी स्व.सुधाकरपंत, सहकार शिरोमणी स्व. वसंतदादा यांचेपासून ऊस दर जाहीर करण्याची परंपरा कारखाना शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मोळी टाकणेच्या वेळी असते. तीच तीच पद्धत आजवर सुरु आहे. पण इथं विठ्ठल चा ऊस दर जाहीर करण्याची एवढी घाई आताच का झाली आहे. याबाबत विठ्ठल परिवार जाणून आहे. 
    चेअरमन अभिजित पाटील यांनी जरी आगामी हंगामातील ऊसदर 3500 देऊ शकतो, असे सांगितले आहे. मात्र आम्हीही सांगतो की आम्हीही जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत दर दिला आहे. पण  दर देताना एवढा गाजावाजा कशाला हवा. दर देण्याची जबाबदारीच आमची असते यामुळे जाहिरात बाजीची गरजच काय? असा सवालही चेअरमन काळे यांनी व्यक्त केला आहे.
   आगामी हंगामाचे वेळी साखरेचे दर जर का 4000 चे पुढे गेले. तर आम्हीही तेवढे दर का नाही देणार? असेही काळे यांनी जाहीर केले आहे.