*दुग्धविकास मंत्र्यांच्या गाडीवर मूरघास फेकण्याचा इशारा* *दुधदर कपातीविरोधात शिवसेना-युवासेना आक्रमक*! *आढीव येथील दूध उत्पादकाचा रस्ता रोको*

*दुग्धविकास मंत्र्यांच्या गाडीवर मूरघास फेकण्याचा इशारा*  *दुधदर कपातीविरोधात शिवसेना-युवासेना आक्रमक*!   *आढीव येथील दूध उत्पादकाचा रस्ता रोको*

पंढरपूर/प्रतिनिधी 

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आज पंढरपूर-कुर्डूवाडी महामार्गावर आढिव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतिने रास्तारोको आंदोलन करण्यात आले, यावेळी दुध उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबत उपस्थित शेतकरी चांगलेच आक्रमक झाले..
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना युवासेनेचे युवानेते रणजित बागल म्हणाले की, सरकार दुध उत्पादक शेतकर्‍यांसोबत दुजाभाव करत आहे, त्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही, आज सरकार जीआर काढुन देखिल एक ही दुधसंघ सरकारचा आदेश पाळत नाही,सरकारमध्ये बसलेल्यांमध्ये शेतकरी विरोधी दुधसंघांवर चाप बसवण्याची धमक नाही का.? असा सवाल यावेळी बागल यांनी विचारला.
राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सत्ताधारी मात्र अधिवेशनात चकार शब्द काढायला तयार नाहीत,दुग्धविकास मंत्री हे हरवले आहेत का असा प्रश्न देखील आता दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.. जर या सरकारचा आदेश न पाळणाऱ्या संघावर कारवाई होत नसेल तर यामध्ये सरकार आणि दुधसंघांमध्ये मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न लोकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही..
सरकारने दुधउत्पादक शेतकर्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, दुधदर कपात करणाऱ्या दुधसंघांवर तातडीने कडक कडक कारवाई करावी, तातडीने पावले उचलली गेली नाहीत तर आगामी काळात दुग्धविकास मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर शेतकरी मुर घास व चारा फेकायला देखील मागेपुढे पाहणार नाहीत असा इशारा देखील बागल यांनी यावेळी बोलताना दिला.. यावेळी प्रशासनाच्या वतिने पोलिस अधिकारी मुजावर यांनी निवेदन स्वीकारले, 
यावेळी शिवसेनेचे इंद्रजीत गोरे शिवसेना उपतालुकाप्रमुख पंढरपूर,विठ्ठलचे संचालक दिनकरदाजी चव्हाण,लंकेश काकासाहेब बुराडे, शेतकरी संघटनेचे सोमनाथ घोगरे, नागनाथ रितुंड रोपळे विभाग प्रमुख,नामदेव चव्हाण शाखाप्रमुख,युवासेना उपतालुकाप्रमुख पंढरपूर समाधान गोरे ,युवासेना उपतालुकाप्रमुख प्रणित पवार,विलास गणगे,,शंकर महाराज चव्हाण, चंद्रकांत महाडिक,सोमनाथ गोरे, दत्तात्रय गोरे,विलास कांबळे, औदुंबर चव्हाण, गणेश जाधव,आबासो चव्हाण, रमेश चव्हाण, द्रोणाचार्य चव्हाण, नवनाथ वाघ आदींसह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..