*खा. निंबाळकर यांचे मताधिक्य वाढविण्याचा भाजपच्या बैठकीत निर्धार* *फलटण येथे पार पडली भाजपच्या पदाधिकारी यांच्यासह कोअर कमिटीची बैठक*

पंढरपूर/प्रतीनीधी
माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खा .रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी महायुतीकडून नक्की आहे.त्यामुळे यांना मागील वेळीपेक्षाही आगामी निवडणुकीत जास्त मतांनी निवडून आणायचे आहे. असा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कोअर कमिटीची बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात बैठक संपन्न झाली . यामध्ये उपस्थित बैठकीत वरील निर्धार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , फलटण ता. प्रभारी विश्वासराव भोसले , जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे. जिल्हा चिटणीस बाळासाहेब कदम , पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते , महिला अध्यक्ष ऊषा राऊत उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले की, फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारीनी ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केले आहे गेल्या ५० वर्षात जिव्हाळा चा असणारा पाणी प्रश्न राजकीय दुष्टा आडकवला होता. तो सोडवण्यासाठी गेली चार वर्षे संघर्ष केला व पाणी प्रश्न सोडवला . रेल्वे, रस्ते, एम आय डी सी , दवाखाना, कोर्ट , असे आनेक विकास कामी मार्ग लावली. त्यामुळे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन मकरद देशपांडे यांनी केले आहे. यावेळी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की माढा लोकसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेसाठी वेळ देऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे तसेच लवकरच पश्चिम महाराष्ट्राची पक्ष संघटनेसाठी एकाच ठिकाणी वाररूम तयार करण्याचा माझा मानस आहे विकास कामा बरोबरच पक्ष सघटणेसाठी वेळ देणार आहे. प्रत्येक बुथ रचनेचा मी स्वतः आढावा घेण्यात येणार आहे. व मी स्वतः तीन बुथची जबाबदारी घेऊन त्या बुथमधील समिती तयार झाले आहेत का . विजयासाठी एक्कावन टक्के ची लढाई करावी लागेल.तरी कार्यकर्ते नी कामाला लागावे असे सुचना दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी पक्षाची रचना लवकर कराव्यात व सुपर वारियरस ला बुथ वाटुन देऊन त्यांच्या कडून बुथ समिती सक्षम करावेत लवकरच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा येणार आहे.असे सांगितले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन अहिवळे महादेव अलगुडे विस्तारक शरद झेंडे, राजेंद्र काकडे , वसंतोष गावडे, संतोष सावंत, सुनील जाधव, नितिन जगताप , सुरज तांदळे , विशाल नलवडे , जालिंदर सस्ते , युवराज सस्ते बबलु मोमीन , रियाज इनामदार महिला पदाधिकारी उपस्थित होते.