. कान्हापुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी *

. *कान्हापुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
करकंब/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हापुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सावित्रीच्या लेकींनी केले
.
.बालिकादिन प्रतिज्ञा,सावित्रीच्या ओव्या इत्यादींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विविध वेशभूषेद्वारे सावित्रीच्या लेकींनी कर्तृत्ववान महिलांची ओळ्ख करून दिली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग माने,सहशिक्षक निलेश अजगर,ज्ञानेश्वर मगर,राहुल करडे,बाळू खांडेकर,सुनीता गिरी व दिपाली वास्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.