*पांडुरंग च्या चेअरमन पदी श्री प्रशांत मालक परिचारक यांची तर व्हाईस चेअरमन पदी कैलासराव खुळे सर यांची बिनविरोध निवड.* *कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या रूपाने नेमतवाडी गावास मिळाला व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान.*

करकंब /प्रतिनिधी:-
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू आमदार माननीय प्रशांत मालक परिचारक यांची तर व्हॉइस चेअरमन पदी कैलासराव खुळे सर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना चे सर्व संचालक सभासद शेतकरी वर्ग व पांडुरंग कारखान्याचा सर्व कर्मचारी वर्ग आणि पंढरपूर तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
करकंब गटातून या पंचवार्षिक च्या श्री पांडुरंगाच्या संचालक पदाची नेमतवाडी येथील कैलासराव खुळे सर, उंबरे येथील ज्ञानदेव ढोबळे, सांगवी येथील विजय जाधव यांची वर्णी लागली आहे. यंदा प्रथमच नेमतवाडी गावास श्री कैलासराव खुळे सर यांच्या माध्यमातून व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक व जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या रूपाने नेमतवाडी गावात मिळाला आहे.
कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक (मालक) यांनी अगदी सुरुवातीपासून सन १९७८-७९ सालापासून पंढरपूर तालुक्यातील करकंब,भोसे,नेमतवाडी,उंबरे मेंढापूर पटवर्धन कुरवली,करोळे नांदोरे,कान्हापुरी बार्डी आदी विविध ग्रामीण भागातील आपले निष्ठावंत शिलेदार सोबत घेऊन पंढरपूर तालुका आर्थिक सामाजिक व शैक्षणिक याबाबतीत कसा अग्रेसर राहील यादृष्टीने काम करून जिल्ह्यातच नव्हे तर कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक मालक यांनी देशामध्ये एक वेगळा आदर्श सहकारी संस्थांच्या बाबतीत निर्माण केला. त्याच धर्तीवर जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी या संस्था नावारूपाला आणून देशामध्ये श्री पांडुरंग कारखान्याचा नावलौकिक मिळवला. कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांचे विश्वासू सहकारी असलेले कै. शंकरराव खुळे अगदी सुरुवातीपासून परिचारक यांच्या निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. यापूर्वी नेमतवाडी गावास कै. शंकराव खुळे यांना संचालक पद मिळाले होते. त्यानंतर श्री कैलास खुळे यांच्या पत्नी ज्योती खुळे यांनाही श्री पांडुरंग कारखान्याचे संचालक पदाची संधी मिळाली होती. कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी असलेले कै. शंकराव खुळे, कै. स्वातंत्र्यसैनिक माणिकचंद शहा, कै. नानासाहेब कानडे, कै. संदिपान देशमुख, कै. नरहर नागरस कै.मारुती पाटील हे सर्व सहकारी निष्ठावंत व विश्वासू म्हणून एक वेगळी ओळख होती. त्या काळी निष्ठेला सन्मान होता, आणि शब्दाला मान होता शब्द प्रमाण मानला जायचा. त्याचप्रमाणे कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी आज पर्यंत आपल्या निष्ठावंतांना प्रत्येक ठिकाणी सन्मानाचे स्थान देऊन सन्मानाची वागणूक ही दिली.श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक पदाच्या निवडीच्या निमित्ताने निष्ठेला किती महत्त्व असते हे सुज्ञ शेतकरी सभासद व सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.