*संत सेवेची आराधना... समाजसेवेला वाहून अखंड जीवन वाहिले सिद्धनाथांना.....!* *श्री.सद्गुरू बजरंगतात्या महाराज आज नामदेव महाराज पुण्यतिथी दिवशी ब्रह्मलीन विलीन*. *महाराष्ट्रातील व करकंब शिष्य परिवारावर दु:खाचा डोंगर*

*संत सेवेची आराधना... समाजसेवेला वाहून अखंड जीवन वाहिले सिद्धनाथांना.....!*   *श्री.सद्गुरू बजरंगतात्या महाराज आज नामदेव महाराज पुण्यतिथी दिवशी ब्रह्मलीन विलीन*.  *महाराष्ट्रातील व करकंब शिष्य परिवारावर दु:खाचा डोंगर*

करकंब/ प्रतिनिधी:- 
करकंब गावाचे भुषण आणि ज्यांनी आपली हयात सिध्दनाथाच्या सेवेत घालवून करकंब गावात आध्यात्मिक वातावरण करुन सर्व तरुण वर्गाला आध्यात्मिक आवड निर्माण करणारे,संत सावता महाराजांचे निस्सीम भक्त  पू.ह.भ.प. बजरंगतात्या महाराज (वय १००)यांच्या प्रदीर्घ आजारामुळे ब्रह्मलीन झाले.करकंब येथे बजरंगतात्या महाराजांनी ४०वर्षापूर्वी श्री सिद्धनाथाचे मंदिर दगडी मंदिर स्वतःच्या कल्पनेतून बांधायला सुरुवात केली होती. स्वतः दगड वाहुन,सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भव्यदिव्य सुंदर सिध्दनाथाच मंदिर उभारले .आज ते करकंब नगरीच भुषण झालेलं आहे,त्याकाळात सुमारे ३५वर्षापूर्वी संत सावता महाराज व नामदेव महाराज समाधी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली.आज पर्यंत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार प्रवचनकारांच प्रवचने ऐका त्याचा लाभ करकंब व पंचक्रोशीतील ग्रामस्थ घेत आहेत,योगायोग असा आज नामदेव महाराज समाधी सोहळा उद्या संत सावता महाराज समाधी सोहळ्या दिवशी लीन होत म्हणजे निश्चित त्यांची सेवा संतचरणी पोहण्याची खुण आहे,तसेच बजरंग महाराज तात्यांना वृक्षारोपण करण्याची आवडही मनापासून होती .१७ एकरात चिंचेच्या झाडांची लागवड करुन वृक्षारोपण करुन पर्यावरणाच रक्षण केले. आज ही सर्व चिंचेची झाडे लाखो रुपयांचे उत्पन्न देत आहेत,भविष्यकाळातील येणाऱ्या अडचणी ओळखून महत्वपूर्ण नियोजन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.एखाद काम हाती घेतल्यावर त्याचा शेवट होईपर्यंत ते काम सोडत नव्हते,त्यांनी सिध्दनाथ मंदिरा बरोबर जाधववाडी, करकंब, बार्डी,लोकरेवस्ती,हणमानगड,येथे हणुमंताची मंदिरे स्थापन केली,त्यांचं बरोबर शंभू महादेवाचे भक्त असणाऱ्या तात्यांनी करकंब ते शिंगणापूर कावड सुरु केली,त्याचवेळी शिंगणापूर येथील देवीची पडझड झालेली पाहिली. आणि लगेच करकंब कर व सर्व शिष्यांच्या माध्यमातून भव्यदिव्य अशी दगडी वेस बांधुन पूर्ण केली,तसेच मंदिराच्या परिसरातील वस्तीवरील येण्यासारख्या साठी रस्ते नव्हते .त्यांनी व सर्व ग्रामस्थांच्या शिष्यवर्गाच्या माध्यमातून शेतरस्ते तयार केले,तात्या कधीही एका जागी थांबत नव्हते. चल इथल्या मंदिरात,चल शिंगणापूरी,चल औंढा नागनाथ ला सर्व शिष्यांना बरोबर घेऊन सतत देवदर्शनासाठी फिरती असायची,दैवी शक्ती असणारे तात्या आज सर्व भक्तांना सतत संतसेवा करा उपदेश देऊन ब्रह्मलीन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुन,नातू सुदाम महाराज यांच्यावर व शिष्यपरिवारावर  ह्या मंदिराची जबाबदारी पडली असून त्यांनी लावलेल्या या महावटवृक्षाची संत सेवेची केलेली आराधना... समाजसेवेला वाहून अखंड जीवनभर केलेल्या अध्यात्मिक कार्याची श्रद्धापूर्वक मनोभावे सुरू राहील.