*करकंब येथे विविध संस्था आणि सामाजिक संघटनेचे वतीने क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले जयंती साजरी* *परिसरातील महिलांचा हिरकणी पुरस्कार देवून सन्मानही केला*

*करकंब येथे विविध संस्था आणि सामाजिक संघटनेचे वतीने क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले जयंती साजरी*  *परिसरातील महिलांचा हिरकणी पुरस्कार देवून सन्मानही केला*

करकंब/ प्रतिनिधी:

येथील न्यू इंग्लिश स्कूल करकंब व स्वर्गीय दत्तात्रय खारे  सामाजिक प्रतिष्ठान कनकंबा ग्रुप यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना विकास मंडळाच्या संचालिका दिपाली संजीव कुमार मेहत्रे महाराष्ट्र राज्य    मराठी विभागाच्या माजी विभाग प्रमुख सुजाता लोहकरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .या कार्यक्रमाच्या वेळी करकंब व करकंब परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मीनाक्षी अंकुश वावरे,  मंगल रघुनाथ भोसले, वंदना भारत शिंदे ,सुलभा अशोक दुधाने ,श्रीमती विमल कुमार दुधाने, महानंदा मोहन शिंदे ,मंगल महादेव सलगर, उर्मिला गणेश  गुळमे यांना शाल श्रीफळ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच  स्वर्गीय शेवंताबाई मारुती जाधव यांना मरणोत्तर सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

.या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य दिलकेशा बागवान, रेखाताई गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितीन खाडे ,मीना राजपूत, आबासाहेब धायगुडे, सुवर्णा संतोष स्वामी, संस्थेचे सचिव अविनाश देवकते सर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजीवकुमार मेत्रे सर ,करकब पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार कैलास हरिहर , सचिन गावडे ,पत्रकार लक्ष्मण शिंदे, राजेंद्र करपे सर, ऋषिकेश वाघमारे ,एल एम जाधव, अरुण बनकर ,सतीश खारे ,बाळू अण्णा गुळमे, सुरज व्यवहारे
नागनाथ गायकवाड उपस्थित होते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सिद्धार्थ क्रिकेट क्लब सिद्धार्थ नगर यांच्या वतीने प्रदीप खंकाळ व ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे यांच्या वतीने गरीब व होतकरू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे स्वागत सुपरवायझर शिंदे मॅडम यांनी केले‌. तर प्रास्ताविक  मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले तर आभार शंकर गायकवाड सर यांनी मानले.