*70 वर्षात एक खासदार तळ्यावर आला.... साऱ्या गावात बोभाटा झाला....!*  *पूर्व भागातील शेतकरी पाणी संघर्ष समिती स्थापन करणार*

*70 वर्षात एक खासदार तळ्यावर आला.... साऱ्या गावात बोभाटा झाला....!*  *पूर्व भागातील शेतकरी पाणी संघर्ष समिती स्थापन करणार*


करकंब/ प्रतिनिधी

: माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच करकंब येथील गाव पाझर तलावाचा पाहणी दौरा केला. पाणी दौऱ्यादरम्यान करकंब करानी आणि त्यांचे जंगी स्वागत केले. त्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 70 वर्षातून एकमेव पहिले खासदार असतील की ज्यांनी करकंब गावातून थेट गाव पाझर तलाव पर्यंत जाऊन पाहणी केली. गेल्या सत्तर वर्षांमध्ये पस्तीस चाळीस वर्षात माढा लोकसभेचा खासदार सामान्य माणसांना सुद्धा माहीत नव्हते. माहित होणे तर सोडा बघणे सुद्धा दुर्मिळ अशी एक गोष्ट होती. त्यानंतरही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर खासदार शरच्चंद्र पवार यांनी हक्क सांगितल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. राष्ट्रवादी च्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचे आज पर्यंत झालेले सर्व खासदार राजकीय सभेसाठी करकंब मध्ये आले. पण करकंब मधील या गाव पातळीवरील एकाही नेत्याने या खासदारांना बोटाला धरून गाव पाझर तलाव आणि पूर्व भागातील दुष्काळजन्य परिस्थिती बाब का दाखवली नाही. दाखवणे तर सोडा कमीत कमी ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणे ही गरजेचे होते. याउलट या माढा मतदार संघाचे खासदार आपापल्या घरी कसे येतील याची जास्त काळजी घेतल्याचे चित्र करकंब करांनी जवळून पाहिले आहे ‌.खासदार तर सोडा पंचवीस वर्ष आमदारकीच्या माध्यमातून पुनर्रचित विधानसभा आमदार की च्या माध्यमातून 15 वर्ष या आमदारकीच्या माध्यमातून गेल्या सत्तर वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असूनही पूर्व भागातील दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न गाव पाझर कालव्याचा प्रश्न अध्याप न सुटणे म्हणजे हे न उलगडणारे आहे. करकंब चा पश्चिम भाग पाण्याने सुजलाम-सुफलाम आहे, तर पूर्व भाग दुष्काळाने होरपळलेला आहे. गेल्या सत्तर वर्षात ज्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी, सामान्य लोकांनी, यांच्यावर विश्वास ठेवून पदरात मताचा जोगवा टाकला. त्याची जाणीव सुद्धा प्रत्येक निवडणुकीत या पूर्व भागातील शेतकऱ्यांना होत राहिली .त्यामुळे या भागातील शेतकरी आता पाणी संघर्ष समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
[04/11, 12:33 pm] Laxman Shinde: साधूच कुळ आणि नदीचं मूळ कधी विचारू नये, अशी जुनी प्रचलित म्हण आहे. 70 वर्षात एक खासदार तळ्यावर येतो त्याचा बोभाटा साऱ्या गावात होतो.यापूर्वी असे का झाले नाही अशीही चर्चा सामान्य लोकातून व सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. खासदार तळ्यावर आल्यावर त्यांनी पाहणी करून करकंब गावासाठी एक दिवस देण्याचे निश्चित केले आहे. त्यावेळी निश्चितच करकंब येथील पूर्व भागातील सर्व शेतकरी यावर त्याचा पाठपुरावा प्रश्न करतीलच पण बारा कोटीची करकंब नळ पाणीपुरवठा योजना पस्तीस कोटीवर गेली कशी याबाबत खासदारांचे लक्ष वेधून या करकंब गाव पाझर तलाव या ठिकाणी जशी पाहणी केली., तशी करकंब नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार का? अशी चर्चाही नागरिकांतून होत आहे.