*युवाशक्तीने केली अनाथांची दिवाळी; सामाजिक बांधिलकीचा जपला आदर्श*

करकंब /प्रतिनिधी.
करकंब येथील युवाशक्ती समूहाने कोरोनाच्या महामारी मध्ये ज्यांचे निधन झाले व नैसर्गिक मृत्यू झाला, ज्यांना मूलबाळ नाही अशा अनाथांना करकंब मधील युवाशक्ती समूहाच्या वतीने प्रभाग क्रमांक चारमधे तेवीस कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप केला. अनाथ लोकांना साडी ,चादर, बेडसेट व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
युवाशक्ती समुहाचे प्रवक्ते सचिन शिंदे, सचिन चरपे, समाधान शिंदे, मंगेश शिंदे, ओंकार कुंभार ,सोमनाथ शिंदे,रमेश कुंभार या युवकांनी घरी जाऊन या लोकांना दिवाळीचे फराळ वाटप केले.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच समाज कार्य करणाऱ्या युवाशक्तीने वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटप केले. इतर सामाजिक गोष्टींमध्ये नेहमी पुढाकार घेणारे युवाशक्तीने पाच अनाथ महिलांना साडी,चादर,बेडसेट,दिवाळी फराळ,वाटप केले.तसेच तीन सफाई कामगार महिलांना साडी वाटप केलं.