*करकंब चे तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय भविष्यात लोकसहभागातून अद्यावत व सुसज्ज असेल-प्रांताधिकारी गजानन गुरव*

:
: *करकंब/ प्रतिनिधी:
-येथील तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी तसेच ग्रामस्थ व शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या शालेय कामासाठी वाढती संख्या लक्षात घेता हे तलाठी कार्यालय व मंडलाधिकारी कार्यालय लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अद्ययावत व्हावे यासाठी आज तलाठी कार्यालय व मंडलाधिकारी कार्यालय भूमिपूजनाचा समारंभ प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यापूर्वी तत्कालीन तलाठी पी पी गायकवाड यांनी लोकसहभागातून तत्कालीन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या तलाठी कार्यालयाचे लोकसहभागातून सुशोभीकरण केले होते.
: या भूमिपूजन सोहळ्यास प्रांत अधिकारी गजानन गुरव पंढरपूरचे लोकप्रिय तहसीलदार सुशील बेल्हेकर मंडळाधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी एस व्ही
खडतरे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत , माजी ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट शरदचंद्र पांढरे युवा नेते अभिषेक पुरवत , प्राध्यापक सतीश देशमुख , महादेव व्यवहारे सुनील मोहिते सचिन शिंदे महेंद्र शिंदे लक्ष्मण जाधव बागवान नागनाथ गायकवाड पाणीपुरवठ्याचे माजी चेअरमन पोपट धायगुडे दत्ता देशमुख आशिष नागरस सर्जेराव शिंदे हेमंत तारळकर कोतवाल गुलाब कोरबु चंद्रकांत उंबर दंड आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ शेतकरी ,व्यापारी ,रेशन दुकानदार उपस्थित होते.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी करकंब येथील रेशन दुकानदार तलाठी कार्यालय व मंडलाधिकारी ले कार्यालयाच्या उभारणीसाठी देणगी स्वरूपात प्रांत अधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे सुपूर्द केली.