*संजय गांधी निराधार लाभार्थीना रेशनचे  मोफत धान्य द्या* *ना. छगन भुजबळ यांच्याकडे संजय गांधी निराधार प्रणित श्रावणबाळ मातापिता संघटनेची मागणी*

*संजय गांधी निराधार लाभार्थीना रेशनचे  मोफत धान्य द्या* *ना. छगन भुजबळ यांच्याकडे संजय गांधी निराधार प्रणित श्रावणबाळ मातापिता संघटनेची मागणी*


 पंढरपूर /,प्रतिनिधी
 राज्यातील सर्व संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थी यांना शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातून मोफत देण्यात यावे अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचेकडे संजय गांधी निराधार प्रणित श्रावणबाळ माता पिता सेवा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
            राज्य शासनाच्या वतीने समाजातील गोर गरीब, दुर्बल घटकांसाठी अर्थ सहाय्यक देण्याच्या हेतुन राज्य व केंद्र शासन पुरुस्कृत योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दोन्ही शासनाकडून विधवा महिलासाठी व 65 वर्षवरील महिलां व पुरुषांना वृध्दाप काळात उपजिविकेसाठी दरमहा 1000/- दिले जातात. या महागाईच्या काळात त्यांना अडचणी होत आहे. वयोमानामुळे त्यांना श्रमाचे व कष्टाचे काम होत नाहीत त्यांना हलाखिचे दिवस सोसावे लागत आहेत. केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने कोवीड-प्रार्दुभाव काळात देशातील सर्व शिधापत्रक धारकांना मोफत धान्य वाटप करण्याची योजना राबविली होती व आताही सुरु आहे. देशातील सामान्य नागरीकांना व योजनेतील निराधार व्यक्तींना याचा लाभ मिळाल्याने महागाईच्या काळात त्यांना आधार देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. तसेच राज्य शासनाने शहरी व ग्रामीण शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यात येत आहे. त्याचा प्रमाणे महागाईच्या काळात राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील सर्वच लाभाथ्या्रंना शासनाच्या वतीने मोफत धान्य पुरवठा झाल्यास त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत किंवा महागाईच्या काळात उपासमार होणार नाही अशी लाभार्थी यांचेकरीता नवीन योजना शासनामार्फत सुरु करण्यात यावी  तरी संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थी यांना मोफत धान्य पुरवठा करणेसाठी शासन स्तरावर विचार होवून निराधार यांना आधार देण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.