*२ वर्षांचे कोरोना काळातील गाळे भाडे, पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी.*        *करकंब ग्रामपंचायतिकडे विरोधी सदस्यांची मागणी.*

*२ वर्षांचे कोरोना काळातील गाळे भाडे, पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी.*        *करकंब ग्रामपंचायतिकडे विरोधी सदस्यांची मागणी.*


       करकंब/प्रतीनिधी

 गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे व्यापार व इतर उद्योग धंद्यांवरती मोठा परिणाम झालेला आहे. आर्थिक व्यवहार सुरळीतपणे न झाल्याने सर्व स्तरातील नागरिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दि.९.९.२०२१रोजी करकंब ग्रामपंचायत येथे सर्व सदस्यांची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
 त्यावेळी माजी सरपंच मारुतीआण्णा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पांडू तात्या नगरकर यांनी कोरोना काळामध्ये करकंब मधील सर्वच नागरिकांची आर्थिक ओढाताण झालेली आहे. त्यामुळे करकंब मधील गाळे भाडे, खोके भाडे, पाणीपट्टी, घरपट्टी, त्वरित माफ करण्यात यावी अशी मागणी केली. संबंधित सरपंच, ग्रामसेवक, यांनी वरील मागणीचा विचार करावा व त्याप्रमाणे सर्व प्रकारचे भाडे माफ करण्यात यावे अशी मागणी केली. करकंब शेजारील भोसे (क) येथील ग्रामपंचायतीने वरील सर्व प्रकारची भाडे माफी केली आहे.
 त्याप्रमाणेच करकंब ग्रामपंचायतीने ही भाडे माफी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
    चौकट-----  कोरोनाच्या संकटामुळे करकंब मधील सर्वच व्यापारी व नागरिकांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे खोके भाडे, गाळे भाडे, पाणीपट्टी, घरपट्टी माफ करण्यात यावी. घरपट्टी वसुली ही डेप्युटी इंजिनियर, टी पी यु,  ग्रामसेवक यांच्या समितीने मालमत्तेची किंमत ठरवून त्याप्रमाणे घरपट्टी वसूल करण्याची पद्धत आहे. परंतु त्याप्रमाणे घरपट्टी वसुली केली जात नाही अंदाजानेच घरपट्टी वसूल केली जात आहे. ज्या नागरिकांकडे खाजगी नळ आहेत व स्वतःचे लाईट कनेक्शन आहे त्यांच्याकडून सार्वजनिक पाणीपट्टी व वीज बिल आकारण्यात येऊ नये.
                माजी सरपंच
            करकंब ग्रामपंचायत
                मारुती देशमुख